राजकारण : महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला आहे. त्यामुळे आता निकाल काय लागणार याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. पण महायुतीला हवं तसं यश मिळालं नाही, महायुतीला भरघोस यश मिळणार नाही, असं म्हणत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महायुतीला घरचा अहेर दिला आहे.
सचिन तेंडूलकरच्या सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्यामुळे या प्रकरणी बच्चू कडू यांनी सचिनने केलेल्या रम्मीच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी माध्यमांशी बोलत असताना लोकसभा निवडणुकीच्या निकालावर भाकित वर्तवलं आहे.
‘आम्हाला असं वाटत होतं महायुतीला भरघोस मतं मिळतील. जास्त जागा मिळेल अशी अपेक्षा होती, पण असं काही घडलं नाही. लोकांच्या नाराजी समोर आल्या आहेत. दोन्ही पक्षाला धार्मिकतेवर नेण्याचा प्रयत्न केला. मुद्यांपासून निवडणुका दूर राहिल्या आहे. त्यामुळे निकाल कुणाच्या बाजूने लागेल हे सांगता येणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले.
<!-- wp:social-links --><ul class="wp-block-social-links"><!-- wp:social-link {"url":"https://gravatar.com/sp24taas13d8ff736a","service":"gravatar","rel":"me"} /--></ul><!-- /wp:social-links -->