शिर्डी : दोन दिवसापुर्वी पुण्यात मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल संघाला 8 गडी राखून पराभूत केले.
पुण्यात शनिवारी रात्री मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत झाली. यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघाने चेन्नईला 8 गडी राखून पराभूत केले. या सामन्यात कर्णधाराला साजेशी खेळताना रोहितने नाबाद 56 धावांची खेळी करत संघाला विजयी केले. मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील हा केवळ दुसरा विजय ठरला. दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या सर्व सामन्यांना हजेरी लावणा-या नीता अंबानी पुण्यातील सामन्याला मात्र उपस्थित नव्हत्या. मुंबई इंडियन्सने शनिवारच्या सामन्यापूर्वी 6 सामन्यात केवळ 1 सामना जिंकला होता. त्यामुळे आपल्या संघाला विजयी लय गवसावी त्यासाठी संघ मालकीन नीता अंबानी सामना सोडून शिर्डीत साईबाबांच्या चरणी लीन होण्यासाठी गेल्या होत्या. मुंबई इंडियन्स विजयी ट्रॅकवर यावी यासाठी मी साईबाबांचा आशीर्वाद मागण्यासाठी शिर्डीत आल्याचे नीता अंबानी यांनी सांगितले.
पुण्यात शनिवारी रात्री सामना सुरू होता तर नीता अंबानी शिर्डीत साईच्या दरबारात होत्या. यावेळी त्यांनी मुंबई इंडियन्स संघाची जर्सी घातली होती. विशेष म्हणजे नीता अंबानी मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवल्यानंतरच शिर्डीतून मुंबईकडे रवाना झाल्या.
चेन्नई संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 169 केल्या होत्या. सुरेश रैनाने नाबाद 75 धावा केल्या तर अंबाती रायुडूने 46 धावांचे योगदान दिले. प्रत्त्युत्तरादाखल मुंबई इंडियन्सने 19.4 षटकात 2 बाद 170 धावा केल्या. रोहित शर्माने 33 चेंडूत 2 षटकार 8 चौकारासह नाबाद 56 धावा केल्या. त्याला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले. त्याआधी मुंबईचे सलामीवीर सुर्यकुमार यादव (44) आणि लुईस (47) यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली होती.