शिर्डी | देशातील आघाडीची उद्योगसमूह रिलायन्स इंडस्ट्रीज आणि त्याअंतर्गत कार्यरत असलेल्या रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी ( jio infocom limited chairman akash ambani) 22 एप्रिल रोजी शिर्डी येथे येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. आकाश अंबानी यांनी साई समाधीवर निळ्या रंगाची शॉल चढवून साईदर्शन घेतलय.
यावेळी त्यांनी साईंच्या द्वारकामाई व गुरुस्थान (dwarkami and gurusthan) या महत्त्वपूर्ण स्थळांनाही भेट दिली. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आकाश अंबानी यांचा शाल, श्रीसाईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला.
साई सक्षात्कारानंतर मुलगा साईचरणी
विशेष बाब म्हणजे, यापूर्वी 15 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स क्रिकेट संघाच्या (mumbai indians ipl team) मालकिणी नीता अंबानी (nita ambani) यांनीही आपल्या आई पूर्णिमा दलाल यांच्यासह शिर्डी येथे येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यांनीही निळ्या रंगाची शॉल साई समाधीवर चढवून भक्तिभाव प्रकट केला होता. यावेळी त्या साईंच्या धुपारती आणि शेजारतीमध्ये सहभागी झाल्या होत्या. यावर्षी मुंबई इंडियन्सच्या यशासाठी त्यांनी साई चरणी प्रार्थना केली होती, आणि त्यांच्या प्रार्थनेला उत्तर मिळाल्यासारखं वाटलं, कारण त्यानंतरच मुंबई इंडियन्सला विजय प्राप्त झाला.

साई दरबारी सर्व समान
आई आणि पुत्र अशा दोघांनीही साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत आपली श्रद्धा व्यक्त केली आहे. हे केवळ एक धार्मिक दर्शन नव्हते, तर अंबानी कुटुंबाच्या साईबाबांवरील नितांत श्रद्धेचे आणि भक्तिभावाचे प्रतिक होते. समाजातील विविध स्तरांतील लोकांप्रमाणेच देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहाचे प्रतिनिधीही साईबाबांच्या चरणी आपली नम्रता आणि कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहेत.
शिर्डी हे केवळ धार्मिक स्थळ नसून श्रद्धेचा महासागर आहे, जेथे देशातील सामान्यांपासून ते दिग्गज उद्योगपतींपर्यंत सर्वजण एकसमान भक्तिभावाने येतात. अंबानी कुटुंबाचे शिर्डी दर्शन हे त्याचेच जिवंत उदाहरण ठरले आहे.
या भक्तिभावपूर्ण भेटीनंतर आकाश अंबानी शिर्डीहून पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. त्यांच्या या भेटीने शिर्डीतील साईभक्तांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला असून.