संगमनेर: शहरातील नामांकित डॉ. अमोल कर्पे यांनी त्यांच्या हॉस्पिटल मध्ये ॲडमिट असलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला गच्ची वर नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना रामनवमीच्या पहाटे घडली आहे. याप्रकरणी अत्याचारीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी डॉ. कर्पे वर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला नाशिक येथून ताब्यात घेतल आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर येथील कॉलेजला 4 एप्रिल रोजी येत असताना या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला श्वास घेण्यास त्रास होत आहे म्हणून तिने तिच्या मैत्रिणीला सांगितले. त्या मैत्रिणीने त्यांच्या वर्ग शिक्षक यांना फोन केला असता वर्ग शिक्षक यांनी डॉ. अमोल कर्पे यांच्या हॉस्पिटलला जाण्यास सांगितले. त्यांनतर तिला ॲडमिट करण्यात आले.
रविवारी 6 एप्रिल रोजी पहाटे 4 ते 5 या वेळेत डॉ. अमोल कर्पे याला ही मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील डॉ. कर्पे हा तिच्या बेडजवळ आला व तिला म्हणाला कि ‘तुला बरे वाटत आहे काय’ तेव्हा ती म्हणाली कि, ‘मला बरे वाटत आहे’ तेव्हा डॉ. कर्पे तिला म्हणाला कि ‘तु जरा बाहेर ये, असे म्हणाल्यानंतर ती बाहेर गेली, नंतर ते तिला टेरिसवर घेवुन गेले. तिच्यावर अत्याचार केला. त्या नंतर तिला खाली जा असे सांगुन तु जर कोणाला काही एक सांगितले तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.
पहाटे घडलेल्या प्रकार पिडीत मुलीने सकाळी आपल्या आईला सांगीतल्या नंतर धक्काच बसला. त्यानंतर आपले बिंग फुटल्याची कुणकुण लागल्याने नराधमान डॉक्टर फरार झाला. मात्र पोलिसांनी त्याला नासिक येथून ताब्यात घेतल.
याप्रकरणी अत्याचारित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी डॉ. अमोल कर्पे याच्या पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक फरनाहाज पटेल या करत आहेत.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी हॉस्पिटल बाहेर मोठी गर्दी केली होती परंतु पोलिसांचा बंदोबस्त असल्याने कोणतेही घटना घडली नाही.