Shirdi News | शिर्डीकरांना तसेच साईसंस्थानच्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक परताव्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’ या गुंतवणूक कंपनीचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड “भूपेंद्र राजाराम सावळे उर्फ सर” आणि त्याच्या वडिलांसह इतरांवर शिर्डी आणि राहाता पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shirdi Crime News | Shirdi Gro More Finance Fraud Case
“मोठा परतावा मिळेल” या आमिषाने सर्वसामान्य नागरिक, भावी नगरसेवक आणि संस्थान कर्मचाऱ्यांच्या गळ्यात गुंतवणुकीचं गाजर झुलवलं गेलं. काही महिन्यांपर्यंत हप्ते देत विश्वास संपादन केला, आणि नंतर अचानक गायब! यामुळे अनेकांचे आर्थिक कंबरडे मोडलं आहे.
‘सर’चा सुपर स्कॅम!
या धक्कादायक घोटाळ्याचा सूत्रधार “भूपेंद्र राजाराम सावळे उर्फ सर” याच्यासह वडील राजाराम भटू सावळे आणि इतर पाच आरोपींविरुद्ध शिर्डी व राहाता पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचे भारतीय न्याय संहिता 318(4), 316(2), 3(5), आणि महाराष्ट्र ठेवीदार अधिनियम (1999) 3 प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हे दाखल असलेले आरोपी:
1. भूपेंद्र राजाराम सावळे उर्फ सर
2. राजाराम भटू सावळे
3. भाऊसाहेब आनंदराव थोरात
4. संदिप सावळे
5. सुबोध सावळे
6. अरुण रामदास नंदन
7. पूजा गोकुळ पोटींडे
भावी नगरसेवक ‘भावीच’!
ग्रो मोरकडून चांगल्या परताव्याचं आमिष दाखवून अनेक भावी नगरसेवकांनी निवडणुकीच्या खर्चासाठी पैसे गुंतवले.
“गुंतवणूक करा, निवडणूक खर्च निघेल” या गोड गप्पांवर विश्वास ठेवून काहींनी सोनं मोडलं, काहींनी शेतजमीन विकली, तर अनेकांनी कर्ज काढलं.
पण आता ‘ग्रो मोर’ “नो मोर” झाला, आणि हे सर्व इच्छुक उमेदवार “भावीच” राहिले!
गुंतवणूकदारांची फसवणूक! समोर आलेले आकडे
राहाता येथील शीतल गोरखनाथ पवार यांनी 8 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली
अनिल रामकृष्ण आहेर यांनी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत 21 गुंतवणूकदारांच्या एकूण 1 कोटी 65 लाख 4 हजार रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला
अजूनही अनेक पीडित पुढे यायला सुरुवात झाली आहे
फसवणुकीचा फॉर्म्युला:
1. सुरुवातीला काही महिन्यांचे हप्ते वेळेवर देऊन विश्वास निर्माण
2. नंतर मोठ्या गुंतवणुकीसाठी प्रलोभन
3. अचानक कार्यालय बंद, फोन बंद, कुटुंबासह फरार!
पोलिसांची कसून चौकशी सुरू – पण अटक नाही!
या घोटाळ्याचा तपास सध्या राहाता पोलीस करत असून कोणालाही अटक झाली नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
“सर”सह इतर आरोपी सध्या फरार असून पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली आहे.
गुंतवणूकदार सावध रहा!
या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही नोंदणीकृत नसलेल्या फायनान्स कंपन्यांपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.
हा फक्त गुन्हा नाही, तर लोकांच्या स्वप्नांवरचा आघात आहे!
या प्रकरणात तुमचीही फसवणूक झाली असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करा.