Political News : महायुतीत येणाचा अजित पवार अन अशोक चव्हाण यांच्या आधी जयंत पाटलांचा नंबर होता मंत्री संजय शिरसाठ यांचं शिर्डीत खळबळजनक भाकित.
जयंत पाटील कधी ना कधी महायुतीत येणारच आहे, अजित पवार, अशोक चव्हाणांचे भाकीत आपण सांगीतले होत.. जयंत पाटलांचा नंबर यांच्या आधी होता,यायला थोडा उशीर होत असल्याचं मंत्री शिरसाट यांनी म्हटलं.
शरद पवारांना धक्का देण्यासाठी आम्ही काम करत नाही मात्र ज्या लोकांना वाटतं सत्तेत जावून चांगल काम कराव त्यांच आम्ही स्वागत करतो अस सांगत जयंत पाटील महायुतीत सामिल होणार असल्याच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ठामपणे स्पष्ट केल.
जयंत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीवर विचारलेल्या प्रश्नावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.
शिंदेंनी केलेल्या उठावात अनेकांनी साथ दिली होती, काही लोक आजही बाहेर आहेत.. ते सुद्धा काही दिवसात आत येतील .. आणि आमचं मिशन टायगर गती पकडायला सुरुवात होईल अस ही मंत्री शिरसाठ म्हटल..