Shirdi Donation : नातळ आणि नववर्षाच्या निमित्तानं शिर्डीच्या साईबाबांच्या झोळीत भाविकांनी भरभरुन दान टाकलयं, गेल्या नऊ दिवसांत आठ लाख भाविकांनी साई समाधीचं दर्शन घेतल असून सोने-चांदी आणि रोख स्वरूपात बाबांना साडे सोळा कोटी रुपयांच महादान प्राप्त झालय.
देशातील क्रमांक दोन आणि राज्यातील नंबर एक वर असलेलं श्रीमंत देवस्थान म्हणून शिर्डी साई बाबांची ख्वाती आहे. याठिकाणी दिवसाकाठी सरासरी साठ हजार भाविक साई दर्शनासाठी हजेरी लावतात. गुरुपौर्णिमा, पुण्यतिथी, रामनवमी अशा उत्सवात भाविकांचा आकडा लाखोंच्या घरात जातो. तर नवीन वर्षाला देखिल लाखो भाविक शिर्डीत दाखल होवून साई बाबा समाधीच मनोभावे दर्शन घेतात.
यंदा देखिल नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तानं आठ लाख भाविकांनी साई बाबांच दर्शन घेत नवीन वर्षाची सुरुवात साईंच्या आशीर्वादानं केलीये. तर आलेले भाविकांनी साईंना तब्बल 16 कोटी 61 लाख 80 हजार 862 रुपये दोणगी दिलीये. नाताळच्या 25 डिसेंबर ते 02 जानेवारी या नऊ दिवसात आलेल्या भाविकांनी मंदिरातील दक्षिणा पेटीत 6 कोटी 12 लाख 91 हजार 875 रुपये, देणगी काऊंटर 3 कोटी 22 लाख 27 हजार 508 रुपये, ऑनलाइनच्या माध्यमातून 4 कोटी 65 लाख 73 हजार 698 रुपये जमा झालेय.. सोने चांदी मिळून 64 लाख 43 हजार 581 रुपयांचे प्राप्त झालेय.. एकुण मिळून 16 कोटी 61 लाख 80 हजार 862 रुपये साईंच्या तिजोरीत नवीन वर्षा जमा झालेय.
साई संस्थान शिर्डी साईंच्या दानाची नऊ दिवासांची मोजदाद करण्यात आली त्यावेळी हा आकडा समोर आलाय. 2024 च्या तुलनेत यंदा भाविकांची संख्या दोन लाखांनी वाढली असून दानात सुद्धा कमालीची वाढ झाल्याच दिसून येतय. आलेल्या दानातून साईसंस्थान भाविकांच्या सेवा सुविधा, आणि कर्मचारी पगारा बरोबरच मोफत भोजनालय, शैक्षणिक संकुल, निवास व्यवस्था आणि धर्मदाय रुग्णालयावर खर्च करते.
साईसंस्थानचे मार्च 2024 अखेर विविध राष्ट्रीयकृत बॅंकेत 2916 कोटी रुपयांची गुंतवणूक असून सध्या हा आकडा 3000 कोटी रुपयांपर्यंत पोहचल्याच दिसून येतय..