Breaking News
Ramgiri Maharaj | सर्वधर्मसमभावच्या नावाखाली दहशतवाद्यांना संरक्षण? रामगिरी महाराजांचे वक्तव्य Maharashtra Alert | पहलगाम हल्ल्यानंतर राज्यातील पर्यटन स्थळांवर अलर्ट? चंद्रशेखर बावनकुळे शिर्डी परिसरात ऑनलाइन वेश्या व्यवसाय? पोलिसांकडून पर्दाफाश पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड सफुल्ला खालीद कोण? Shirdi Ambani News | आई नंतर पुत्र आकाश अंबानीं साईचरणी लीन राजू शेट्टींचा संतप्त हल्लाबोल: “शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारच्या मंत्र्यांना तुडवा!” शिर्डीतून चीनला संदेश – “भारतीय सैन्य सक्षम, सिक्कीम सज्ज” : मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग Shirdi | शिर्डी साईबाबांना 68 लाख रुपयांचा सुवर्ण मुकूट दान शिर्डीत शिल्पा शेट्टीचं साईबाबांचं दर्शन : पिंक ड्रेस बद्दल सांगितलं गुपीत संगमनेरात रामनवमीच्या दिवशीच अंगात शिरला रावण? डॉक्टराने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार नारायण राणेंचा मोठा दावा; पुढच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरेंचा पक्षच राहणार नाही Shirdi ATM Fraud | मध्यप्रदेशचा उच्चशिक्षित भामटा महाराष्ट्रात, 70 एटीएमसह घालत होता गंडा ऊस वाहतूकीचे जुगाड लोकांच्या जीवावर, आरटीओ आणि पोलिस साखरपेरणीत खुष? Sanjay Shirsat : जयंत पाटील महायुतीत येणारचं, मंत्री शिरसाट यांचा दावा
31.1 C
Maharashtra
Saturday, May 3, 2025

Raigad Bharat Gogawale: जो भावाचा नाही, तो आमचा काय? भरतशेठ गोगावले बरसले

- Advertisement -

Raigad Politics: रायगडच्या पालक मंत्रिपदाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे, रायगडच्या पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर नाराजीनाट्य सुरू झालं. मंत्री भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रिपद न मिळाल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा देखील सुरू होती. त्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली.

मात्र पूर्वी ज्यांच्या नावाची घोषणा पालकमंत्री म्हणून झाली आहे, तेच प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करतील असं ठरलं होतं. त्यामुळे आज आदिती तटकरे यांनी झेंडावंदन केलं.  यावर बोलताना आता भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनीत तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले भरत गोगावले? 

मंत्री म्हणून त्यांनी झेंडावंदन केलं, आम्ही त्याबद्दल काही बोलणार नाही. जर मी काही चुकीचं काम केलं असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर यावेळी बोलताना त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे, तटकरे यांचं नाव न घेता हल्लाबोल केला. जो भावाचा नाही झाला तो आमचा काय होणार, आव्हान स्किकारून चालतो तोच यशस्वी होतो. मंगळवारी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, काही गोष्टी या गनिमी काव्याच्या असतात, असं गोगावले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना आमदार महेंद्र दळवी यांनी देखील आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री या आदिती तटकरे होत्या,  त्यांना वैतागून आम्ही रायगड जिल्ह्यातल्या तीन आमदारांनी उठाव केला, आणि त्यानंतर गुवाहाटीचं लोण संपूर्ण राज्यात पसरलं. त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झालं. पण इतकं होऊन सुद्धा सुनील तटकरे यांची महायुतीच्या सरकारमध्ये मागच्या दाराने एन्ट्री झालीच,  आणि पुन्हा एकदा त्यांची जादू चालली. त्यांनी मुलीला मंत्री बनवलं पण पालकमंत्री हे उदय सामंत होते.

आता पुन्हा दुसऱ्यांदा महायुतीची सत्ता आली यावेळेस सुनील तटकरे यांनी जादू केली आणि आपल्या मुलीला पालकमंत्रिपद दिलं. त्यांच्याकडे काय जादू आहे ते माहित नाही. आम्ही पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले यांचं नाव फायनल केलं होतं, पण ते रात्रीतून कसं बदललं असा प्रश्न दळवी यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
315,632SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles