Breaking News
Ahilyanagar Fake Note Crime |राहुरीत बनावट नोटा प्रकरण उघडकीस : 66 लाखांसह तिघांना अटक.. Koparagoan | कोपरगावात बिबट्याच्या जबड्यातून आजोबांनी वाचवला चार वर्षांचा नातू! Shaheed Sandip Gaikar | शहीद संदीप गायकर यांना अखेरचा निरोप; ब्राह्मणवाडा गावात शोकसागर पाकिस्तानप्रेमींना दहशतवाद्यांच्या हवाली करा; शिर्डीत मंत्री विखेंचा स्फोटक घणाघात Shirdi | शिर्डीत बनावट पोलीस अधिकारी अटकेत, श्रीरामपुरचा जग्गू इरानी अखेर धरला Shirdi Trust Update | शिर्डी साई संस्थानवर प्रशासकीय समितीची स्थापना Shirdi News | शिर्डीत देणगीदारांसाठी नवीन धोरण, व्हीआयपी रकमेची मर्यादा घटवली शिर्डीतील गुटखा किंगला राजकीय वरदहस्त? चार लाखांचा गुटखा जप्त.. Ramgiri Maharaj | सर्वधर्मसमभावच्या नावाखाली दहशतवाद्यांना संरक्षण? रामगिरी महाराजांचे वक्तव्य Maharashtra Alert | पहलगाम हल्ल्यानंतर राज्यातील पर्यटन स्थळांवर अलर्ट? चंद्रशेखर बावनकुळे शिर्डी परिसरात ऑनलाइन वेश्या व्यवसाय? पोलिसांकडून पर्दाफाश पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड सफुल्ला खालीद कोण? Shirdi Ambani News | आई नंतर पुत्र आकाश अंबानीं साईचरणी लीन राजू शेट्टींचा संतप्त हल्लाबोल: “शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारच्या मंत्र्यांना तुडवा!”
25.3 C
Maharashtra
Tuesday, July 1, 2025

Shirdi Airport | केंद्रीय मंत्री अमित शहा आणि मंत्री विखे पा. यांच्या बैठकीला यश, लवकरच शिर्डी विमानतळावर नाईट लॅंडींग

- Advertisement -

शिर्डी: केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी यांची सदिच्छा भेट घेतली. या दरम्यान शिर्डी विमानतळावरून नाईट लॅंडींग सुविधा तातडीने सुरू करण्याची तसेच नदीजोड प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती मंत्री विखे पाटील यांनी केली आहे.

मागील अडीच वर्षात महायुती सरकारने सामान्य नागरीकांसाठी यशस्वीपणे राबवलेल्या योजनांना जनतेचे मोठे पाठबळ मिळाले असल्याचे सांगतानाच महसूल व दुग्ध व्यवसाय विकास विभागाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णय व कार्यान्वित झालेल्या योजनांची माहीती मंत्री विखे पाटलांनी भेटीत झालेल्या चर्चे दरम्यान दिली.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश आणि अहिल्यानगर मधील दहा विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर
मंत्री अमित शहा आणि ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सविस्तर चर्चा झाली.

महायुती सरकार मध्ये पुन्हा मंत्री पदाची संधी दिल्याबद्दल विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आभार मानले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आशा नदीजोड प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्याची विनंती मंत्री विखे पाटील यांनी केली आहे.

शिर्डी विमानतळावरून नाईट लॅण्डीग सुविधा सुरू करण्याबाबत केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देवून आजच केंद्रीय सुरक्षा दलाचे मनुष्यबळ उपलब्ध करून देवून पुढील काही दिवसांत नाइट लॅण्डीग सुविधा सुरू करण्याची ग्वाही मंत्री अमित शहा यांनी दिली असल्याचे राधाकृष्णविखे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
315,632SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles