शिर्डी : शिर्डीच्या साईबाबांच्या (Shirdi Sai baba) नावाने नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात ( nashik kumbh mela ) नवीन आखाडा सुरु होणार असल्याची ऐतिहासिक घोषणा आज शिर्डीत करण्यात आली. ही घोषणा उत्तराखंडमधील जोगेश्वरधामचे महंत महादेव दास महाराज ( uttarakhand jogeshwar dham ) यांनी केली असून, देशभरातील साईभक्तांसाठी ही मोठी अभिमानाची बातमी ठरली आहे.
सध्या भारतात एकूण 13 अखाडे प्रचलित आहेत. येत्या कुंभमेळ्यात शिर्डी साईबाबा नावाचा 14वा अखाडा सुरू होणार असून त्यासंबंधीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे महंत महादेव दास महाराज यांनी स्पष्ट केले.
shirdi news a news hindu akhada in the name of shirdi sai baba at nashik kumbh mela
हिंदू-मुस्लिम वादाला चपराक
शिर्डीत आज मध्यान्ह आरतीला सहभागी झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना महंत महादेव दास महाराज म्हणाले –
“साईबाबा म्हणजे शिवस्वरूप आहेत. त्यांना हिंदू-मुस्लिम वादात अडकवणारे मुर्ख आहेत. साईंचे कार्य सर्वधर्मसमभावाचे आहे. म्हणूनच त्यांच्या नावाने अखाडा काढला जाणार आहे.”
“गेल्या काही दशकांपासून साईबाबांना हिंदू किंवा मुस्लिम ठरवण्याचे अपयशी प्रयत्न झाले. पण कुंभमेळ्यात साईबाबांच्या नावाने आखाडा निघाल्यानंतर ही सारी मतभेदाची चर्चा संपुष्टात येईल.”
साईमंदिरातील दर्शन आणि साईचरित्र पारायणात उपस्थिती
महंत महादेव दास यांनी आज शिर्डीत येऊन साईमंदिरात मध्यान्ह आरतीचे दर्शन घेतले. श्रावण महिन्यात सुरू असलेल्या श्री साईचरित्र पारायण सोहळ्यात सहभागी होऊन त्यांनी साईंच्या कार्याला वंदन केले. मंदिरातील दैनंदिन पूजा-अर्चा पाहून त्यांनी ट्रस्टच्या कार्याचेही कौतुक केले.
तयारी अंतिम टप्प्यात..
कुंभमेळ्यात अखाडा स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेली नोंदणी व धार्मिक परंपरांनुसार मान्यता घेण्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. महंतांनी स्पष्ट केले की, 2027 च्या कुंभमेळ्यात लाखो भाविक साईंच्या नावाने अखाड्याच्या शोभायात्रेत सहभागी होतील.