शिर्डी : शिर्डी परिक्रमा या महायात्रेचा ध्वजारोहण सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडलाय. साई मंदिरात बाबांच्या समाधीवर ध्वज अर्पण करत गावातून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर साई मंदिराच्या प्रवेशव्दार क्रमांक चार समोर साईसंस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, शिर्डी ग्रामस्थ आणि ग्रीन एन क्लिन शिर्डीच्या पदाधिका-यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
भारतवर्षात प्रत्येक तिर्थक्षेत्राच्या ग्राम परिक्रमेला विशेष महत्त्व सांगीतल जात. याचधर्तीवर साई बाबांच्या नगरीत देखिल शिर्डी परिक्रमा महोत्सवाच आयोजन केल जात. दरवर्षी प्रमाणे यंदा ही तेरा फेब्रुवारी रोजी चौदा किलोमीटरच्या शिर्डी परिक्रमेचा उत्सव साजरा केला जातोय. साईसंस्थान, शिर्डी ग्रामस्थ आणि ग्रीन एन क्लिन शिर्डीच्या माध्यमातून ह्या परिक्रमेच आयोजन केल जात.
तेरा फेब्रुवारी रोजी शिर्डीतील आओ साई खंडोबा मंदिरापासून सकाळी साडे पाच वाजता ह्या परिक्रेमेला प्रारंभ होतोय.ज्यात लाखभर भाविक स्वयंस्फुर्तीने दाखल होतात.. याच सोहळ्याचा ध्वजारोहण कार्यक्रम आज साई मंदिरात मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
साई बाबांच्या समाधीवर परिक्रमेचा ध्वज अर्पण करत तसेच मिरवणूक काढून ग्रामदैवतांना परिक्रमेच आमंत्रण देण्यात आलय.. साई मंदिर महाव्दार क्रमांक चार समोर विधीवत पुजन करत शिर्डी परिक्रमेच ध्वजारोहण सोहळा पार पडला.
साई बाबा संस्थान, शिर्डी ग्रामस्थ , ग्रीन एन क्लीन शिर्डीचे पदाधिकारी यांच्या साक्षीनं ध्वज फडकवण्यात आलाय. नेहमी प्रमाणे यंदा देखिल भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असणार असून पाच लाख भाविक शिर्डी परिक्रमेत सहभागी होतील असा अंदाज वर्तवला जातोय.. चौदा किलो मिटरची ही परिक्रमा जवळपास सहा तासात पुर्ण होवून साईमंदिराच्या शताब्दी मंडपात समारोप केला जातो.