शिर्डी | भारत-पाकिस्तान युद्ध सुरू (bharat pak) असल्याचं सांगत वयोवृद्ध नागरिकांची तपासणी करत, त्यांना लुबाडणाऱ्या एका सराईत भामट्याला शिर्डी पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आरोपी जाकीर हुसेन युसूफ खान उर्फ ‘जग्गू इरानी’ (वय ३०, रा. श्रीरामपूर) याच्यावर विविध राज्यांमध्ये वीसपेक्षा अधिक गुन्हे दाखल असून तो पोलिसांना अनेक दिवसापासून हवा होता, अशी माहिती डीवायएसपी शिरीष वमने ( shirdi dysp shirish wamne) यांनी दिली.
shirdi police arrested fake policemen who finally deceived the elderly
शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस (shirdi police) निरीक्षक रणजित गलांडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी सध्या शहरात सक्रिय असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. त्यानुसार, जग्गू इरानी एका वयोवृद्धाला “युद्ध सुरू आहे, तपासणी करावी लागेल” असं सांगून त्यांची अंगठी आणि रोकड घेण्याचा प्रयत्न करत होता, याच वेळी पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडलं.
पोलिस अधिकारी असल्याचा बनाव
पोलिस तपासात उघड झालं की, जाकीर हुसेन हा अनेक वेळा स्वतःला पोलीस अधिकारी, सीबीआय अधिकारी असल्याचं सांगून सामान्य नागरिकांना फसवायचा. त्याच्याकडे बनावट पोलीस ओळखपत्र सापडलं असून तो अत्यंत हुशारीने वयोवृद्ध, एकटे दुकट्या नागरिकांना लक्ष्य करत असे.
नंबर नसलेली दुचाकी व बनावट कागदपत्रं जप्त
अटक कारवाई दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून नंबर नसलेली नवी कोरी पल्सर दुचाकी देखील जप्त केली आहे. या दुचाकीच्या वापरातून तो वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे करत तसेच ही दुचाकी चोरीची असल्याचं समोर आल असून शिर्डीत तो याच दुचाकीवरुन फिरताना पोलीसांनी त्याला ताब्यात घेतलय.
जग्गू इरानी कोण आहे?
आरोपी जाकीर हुसेन युसूफ खान उर्फ जग्गू इरानी या नावाने तो गुन्हेगारी क्षेत्रात प्रचलित आहे. श्रीरामपुर येथिल हा राहणारा असून त्याच्याकडे विविध ओळखपत्र देखिल मिळून आले. याने विविध राज्यात फसवणुकीचे गुन्हे केले आहेत. तो स्वतःला केंद्रीय तपास यंत्रणांचा अधिकारी (CBI) असल्याचं सांगायचा. शिर्डीमध्येही त्याने वयोवृद्धांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याच समोर आलं असून शिर्डी पोलीसांनी त्याला वेळेवर कारवाई करत पकडलं. त्याच्याविरोधात आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिर्डी पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि सुसूत्र नियोजनामुळे एक सराईत भामटा गजाआड गेला असून, नागरिकांनी अशा बनावट आणि भामट्यांपासून सावध राहावं, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.