शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा मंदिरात (shirdi sai baba temple donation policy) देणगी देणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. साईबाबा संस्थानने नवी व्हीआयपी डोनर पॉलिसी लागू केली असून, दहा हजारांपासून सुरू होणाऱ्या देणगीवरही आता व्हीआयपी सुविधा मिळणार आहेत. संस्थानने यापूर्वी व्हीआयपी सेवा फक्त 25 हजार रुपयांवरील दानावर मर्यादित केली होती, मात्र आता ती मर्यादा कमी करून दहा हजारांवर आणण्यात आली आहे.
सहा टप्प्यांतील सुविधा :
साई संस्थानने ही डोनर पॉलिसी सहा भागांमध्ये विभागली असून, दानाच्या रकमेप्रमाणे भाविकांना विविध प्रकारच्या व्हीआयपी सेवा दिल्या जाणार आहेत.
10,000 ते 25,000 रुपये : एक वेळेस व्हीआयपी आरती
25,000 ते 50,000 रुपये : एक व्हीआयपी आरती एक वेळेस व्हीआयपी दर्शन
50,000 ते 1 लाख रुपये : दोन वेळा प्रोटोकॉल आरती
1 लाख ते 10 लाख रुपये : पहिल्या वर्षी दोन प्रोटोकॉल आरती पुढील प्रत्येक वर्षी एक प्रोटोकॉल आरती वर्षातून एक वेळेस तहयात व्हीआयपी दर्शन
10 लाख ते 50 लाख रुपये : दरवर्षी दोन प्रोटोकॉल आरती वर्षातून एक वेळेस तहयात व्हीआयपी प्रोटोकॉल दर्शन साईबाबांना आरतीवेळी परिधान करावयाचे वस्त्र चढवण्याची संधी
50 लाखांहून अधिक देणगी : दरवर्षी तीन प्रोटोकॉल आरती वर्षातून दोन वेळेस तहयात व्हीआयपी प्रोटोकॉल दर्शन साईबाबांना आरतीवेळी परिधान करावयाचे वस्त्र चढवण्याची संधी
नोंदणी व अटी :
देणगी देताना कुटुंबातील पाच सदस्यांची नावे नोंदवावी लागणार आहेत. देणगी झाल्यानंतर संबंधित भाविकाला प्रत्यक्ष किंवा एसएमएसव्दारे सुविधा संबंधित माहिती वेळोवेळी दिली जाणार आहे.
काही विशेष सूचनाही :
ही पॉलिसी गुरुपौर्णिमा, रामनवमी, पुण्यतिथी व इतर अती गर्दीच्या दिवशी लागू नसेल, असे देखिल साई संस्थानकडून स्पष्ट केले आहे.
भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :
या नव्या धोरणामुळे मध्यमवर्गीय भाविकांनाही व्हीआयपी सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दहा हजार रुपयांत एकदा व्हीआयपी आरतीची संधी ही अनेकांसाठी आनंददायी बाब ठरत आहे.
साई संस्थानच्या या नव्या निर्णयामुळे अधिक पारदर्शक आणि योजनाबद्ध दान व्यवस्थापनाची दिशा स्पष्ट होत आहे.