शिर्डी | गुरुपौर्णिमा उत्सवाच्या तीन दिवसांत शिर्डीच्या साईबाबा (shirdi saibaba) समाधीला तब्बल 6 कोटी 31 लाख 31 हजार 362 रुपयांचं दान प्राप्त झालं आहे. साईसंस्थानचे (shirdi sai trust) मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी ही अधिकृत माहिती दिली.
या कालावधीत तीन लाखांहून अधिक भाविकांनी साईसमाधीचं दर्शन घेतलं, तर तेरा देशांमधून आलेल्या भाविकांनी विदेशी चलन रूपाने दान दिलं आहे. देणगीची मोजदाद संस्थानच्या रोख, कार्ड, ऑनलाइन आणि प्रत्यक्ष स्वरूपातील विविध माध्यमातून झाली.
(Shirdi Saibaba Recordbreak Donation in guru pornima festival 6 core 31 lakh)
असं मिळालं दान – तपशीलवार मोजदाद
दक्षिणा पेटी (रोख स्वरूपात) – 1 कोटी 88 लाख 08 हजार 194
देणगी काउंटर (रोख) – 1 कोटी 17 लाख 84 हजार पीआरओ शुल्क
पास देणगी – 55 लाख 88 हजार 200
डेबिट/क्रेडिट कार्ड, ऑनलाईन, चेक/DD, मनीऑर्डर – 2 कोटी 5 लाख 76 हजार
626 सोने (668 ग्रॅम) – 57 लाख 87 हजार 925
चांदी (790.400 ग्रॅम) – ₹5 लाख 85 हजार 879
एकूण रक्कम – 6,31,31,362
शिर्डीतील साईसंस्थानच्या पारदर्शक व्यवस्थापनातून हे आकडे अधिकृतरीत्या सादर करण्यात आले असून, यंदाच्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवात साईभक्तांनी दिलखुलास दान करत साईप्रेमाची आणखी एक प्रेरणादायी नोंद घडवली आहे.