शिर्डी: साईबाबा संस्थान संचालित साई प्रसादालयाच्या नियमावलीत आज गुरुवार पासून मोठे बदल करण्यात आले आहेत. मद्यपान आणि धूम्रपान करुन भावीकांना भोजन कक्षात त्रास देणा-या अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रसादालयात टोकन पद्धत राबविण्याचा अभूतपूर्व निर्णय संस्थानच्या वतीने घेण्यात आला. सकाळी सहा वाजेपासून भाविकांना साईदर्शनानंतर मोफत भोजनाचे टोकन वाटप करण सुरु करण्यात आले.
साई दर्शनानंतर मोफत भोजन टोकन दिले देण्याची व्यवस्था करण्यात आली असून आता टोकन शिवाय प्रसादालयात प्रवेश मिळणार नाही तर उद्या गुरुवार पासून ह्या नियामाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
शिर्डीत साईबाबा संस्थानच्या वतीने आशिया खंडातील सर्वात मोठे भोजनालय चालवले जाते.. याठिकाणी सर्वसाधारण हॉल मध्ये मोफत भोजन दिले जाते. दिवसाकाठी सरासरी येथे पन्नास हजार भावीक साई प्रसादाचा लाभ घेतात.. मात्र त्याच बरोबर गुन्हेगारी प्रवृत्ती, अमलीपदार्थांचे सेवन केलेली मंडळी, धुम्रपान करणारे काही व्यक्ती हे देखिल प्रसादालयात प्रवेश करुन भोजन करतात तसेच यावेळी भाविकांना त्रास देखिल देत असल्याच्या तक्रारी संस्थानला प्राप्त झाल्याय..
भाविकांच्या तक्रारी नंतर आता साई संस्थानच्या वतीने प्रसादालय प्रवेशावर काही निर्बंध घालण्यात आलेय.. साई मंदिरात दर्शन करुन बाहेर पडणा-या भाविकांना उदी -बुंदी प्रसादा बरोबरच साई प्रसादालयातील मोफत भोजनाचे टोकन दिले जाणार आहे.. तसेच ज्या भाविकांना अगोदर भोजन करायचे असेल त्यांना प्रसादालयातच मोफत भोजनाच टोकन देण्याची व्यवस्था करण्यात आलीये.. निवास व्यवस्था, साईसंस्थान दोन्ही रुग्णालये येथिल पेशंट नातेवाईकांना देखिल टोकन दिले जाणार असून शिर्डीत आलेला कोणताही भाविक उपाशी राहणार नाही याची दक्षता साईसंस्थानच्या वतीने घेण्यात आल्याच संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केले आहे.
भाविकांकडून नवीन नियमांचे स्वागत
आज सकाळ पासून साई प्रसादालया बाबत नवीन नियमावली लागू झाल्यानं भाविकांनी साई संस्थानच्या या नियमाचं स्वागत केले आहे. अनेकदा मद्यपेयी किंवा धुम्रपान करणारी मंडळी भाविकांच्या शेजारी बसून भोजन करत असे त्यामुळे भाविकांना त्रास होत असल्याचं खुद्द भाविकांनी स्पष्ट करत या निर्णयाच कौतूक केले आहे.
गेल्या चार दिवसापुर्वी साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची निघृण हत्या करण्यात आली त्यामुळे प्रशासन एक्शनमोड वर असून शिर्डीतील गुन्हेगारी कमी करण्यासाठी उपाय योजना करत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी, “शिर्डीत देशभरातील लोक फुकट जेवायला येतात. महाराष्ट्रातील सर्व भिकारी इथं जमा झालेत,” असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर साई प्रसादालयातील मोफत भोजन बंद करुन सशुल्क करावं, अशी मागणी झाली होती. मात्र, मोफत भोजन बंद न होता आता टोकन पद्धत सुरु झाल्यानं काही प्रमाणात प्रसादालयात भाविकाव्यतिरिक्त येणाऱ्या लोकांवर नियंत्रण राहील, अशी स्थानिक नागरिकांमधून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.