शिर्डीः साई बाबा मंदिराच्या सुरक्षा पथकात आता सिंबा नावाच्या नव्या श्वानाची एन्ट्री झाली आहे. वर्धन श्वाननं दहा वर्ष सेवा दिल्यानंतर आता तीन महिने वयाचा सिंबा आता बॉम्ब शोधक आणि नाशक पथकात दाखल झाला आहे. साईमंदिरात दररोज तपासणी केली जाते यात आता सिंबा सेवा देणार असून त्याची ट्रेनिंग सुरु आहे. पाहा सिंबाची जबरदस्त एन्ट्री..
Video:शिर्डी साईमंदिरात आला रे आला ‘सिंबा आला, पाहा व्हीडीओ
बीडीडीएस पथकात पूर्वी 'वर्धन' नावाचा श्वान कार्यरत होता. मात्र, तो सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच्या जागी आता सिंबा दाखल झालाय. सिंबाचं सध्या साई मंदिर परिसरात प्राथमिक प्रशिक्षण सुरू आहे. लवकरच तो पुणे सीआयडी येथून ट्रेन होऊन साई मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात होणार आसल्याची माहीती देण्यात आली.