शिर्डी: विधानसभा निवडणूकी नंतर साईबाबांच्या शिर्डीत राजकीय पक्षांनी अधिवेशनाचा सपाटा लावलाय. गेल्या पंधरा दिवासात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिवेशन पार पडले. महत्वाच म्हणजे हे दोन्ही अधिवेशन शनिवार-रविवार झाले. अशा सुट्यांच्या दिवशी राजकीय अदिवेशन झाल्यानं संजय राऊत यांनी यावर आक्षेप घेत विरोधकांचा समाचार घेतला. संजय राऊत शिर्डीत साईबाबा दर्शनासाठी आले असताना त्यांनी महाविकास आघाडी अबादित राहाणार असून चिंता करु नका असं ही म्हटलं.
सुट्यांच्या दिवसात शिर्डीत साईभक्तांची प्रचंड गर्दी असते अशात राजकीय पक्ष पंचवीस-तीस हजार पदाधिका-यांचे अधिवेशन याठिकाणी भरवतात, ह्या सगळ्या गर्दीचा परिणाम साईभक्तावर होत असल्यानं शिर्डीत राजकीय पक्षांनी अधिवेशन घेवू नये तसेच येथिल जनतेचा संयम सुटेन याची वाट त्यांनी पाहू नये अस राऊत यांनी स्पष्ट करत अगामी काळात शिर्डीत होणा-या शिंदेंच्या शिवसेनेच्या अधिवेशनालाही विरोध केल्याच दिसून येतय..
काय म्हणाले संजय राऊत
आम्ही श्रद्धा सबूरी मानतो, मात्र या राज्यातील जनतेत आता सबूरी राहीली नाही.काही दिवसापुर्वी येथे अधिवेशन झाले. येथे सातत्यांन राजकीय पक्षांचे अधिवेशन होताय.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचं झालं, भाजपाच झालं. आता अजून एक अधिवेशन होणार आहे. सुटीच्या दिवशी शनिवारी-रविवारी पंचवीस-पंचवीस हजार लोक येथे गोळा होतात. याचा भार येथिल भक्तांवर आणि मंदिरावर पडतो. हे कुठं तरी थांबायला हवं. अनेक भक्तांनी माझ्याकडे शिवसेना भवनात येवून तक्रारी केला. पंचवीस तीस हजार लोक तुम्ही शिर्डीत जमा होतात.आणि देशाभरातून येणा-या भक्तांवर आक्रमण करतात, गोंधळ घालतात. पंचवीस हजार राजकीय लोकं येथे येतात. मला असं वाटत की येथिल लोकांचा संयम हळूहळू तुटत चालला आहे. ही अधिवेशन नगरी झाली आहे, मला वाटत साईबाबा सगळ्यांनाच आशीर्वाद देत असतीलच अस नाही. त्यांनी आम्हाला सांगीतलय श्रद्धा आणि सबूरी आम्ही श्रद्धा आणि सबूरीनं घेतोय. महाविकास आघाडीत श्रद्धा आणि सबूरी आहे त्यामुळे तुम्ही चिंता करु नका महाविकास आघाडी कायम राहील.
लोकसभा निवडणूकी आधी आणि विधानसभा निवडणुकी नंतर शिर्डीत राजकीय पक्षांनी अधिवेशन घेत ऐन गर्दीच्या काळात शिर्डीला साईदर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या निवास सुविधा आणि दर्शन सुविधेत अडथळे आणल्याच दिसून आल होत..
पंधरा दिवसापुर्वी रविवारी 12 जानेवारी 2025 रोजी भाजपच महाविजय अधिवेशन पार पडलय तर 18-19 जानेवारी रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचं अधिवेशन येथे झालाय.. तर आगामी काळात शिवसेना शिंदे गटाच अधिवेशन देखिल शिर्डीत होणार असल्याच बोलल जातय. त्याआधीच संजय राऊतांनी शिर्डीत होणा-या अधिवेशनावर आक्षेप घेत राजकीय पक्षांच्या अधिवेशनाला विरोध केला.
संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई तिघे शिर्डीत साई दर्शनासाठी आले असताना त्यांनी साई बाबा समाधीच दर्शन घेतल. तर यावेळी बोलताना आम्ही श्रद्धा आणि सबूरीन घेत असून महाविकास आघाडी कायम राहील अस स्पष्ट केल.