शिर्डी: मातृत्व आणि वात्सल्यावर टीचभर पोटाची खळगी भारी पडल्याचं शिर्डीतील एका धक्कादायक प्रकारान समोर आलं. शिर्डी बसस्थानकातील कंपाऊंडजवळ पोटच्या लेकरांना साखळीने बांधून ठेवत आई भंगार वेचत असल्याचा काळीज पिळवटून टाकणा-या घटनेन प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडलंय. शुक्रवारी दुपारी दगडाला पाझर फोडणारा एक व्हीडीओ समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
शिर्डी बस स्थानकाजवळील कंपाऊंडजवळ एक महिला गेल्या चार ते पाच महिन्यांपासून वास्तव्यास होती. बसस्थानकातील सुलभ शौचालयाच्या बाजूलाच आश्रय घेत तिनं बस्तान मांडल, दिवसभर भंगार गोळा करण्यासाठी जाताना तिचे दोन वर्षांचे व आठ महिन्यांचे चिमुकले तिला त्रासदायक ठरू नयेत म्हणून त्यांना साखळीने गळ्यात बांधून कुलूप लावत याठिकाणी ठेवत असे.
भंगार गोळा करण्याचा व्यवसाय
महिला भंगार गोळा करण्यासाठी निघून गेल्यावर हे मुलं तासंतास तिथेच एकटे राहत असत. जाणारा येणारा रडत असलेल्या मुलांना खाण्यास ही देत असे. दोन्ही मुलांच्या गळ्यात साखळी आणि त्याला कुलूप लावले पाहील्यानंतर अनेक जण चक्रावून जात. मात्र दोन्ही मुल गोंडस असल्याने त्यांना खावू ही घालत असे. सदर महिला भंगार गोळा करुन तिचा उदरनिर्वाह करत. पाण्याचा रिकाम्या बाटल्या, पुठ्ठे असे सहज हाताला लागणारे भंगार गोळा करुन दिवसभरात तिला जेमतेम शंभर दिडशे रुपयांची कमाई होती. मात्र यावेळी तिचे दोन्ही पोटचे गोळे साखदंडात असतं.
स्थानिकांनी केले प्रकरण उघड
हा प्रकार दिवसेंदिवस सुरू असल्याने याच भागातील रहिवासी बाबासाहेब गायकवाड यांनी संबंधित महिलेला समज दिली. मुलांना या प्रकारामुळे मोठा त्रास होत असल्याचे सांगत त्यांना अनाथाश्रमात ठेवण्याचा सल्लाही दिला. मात्र, महिलेने नागरिकांचे म्हणणे धुडकावून लावत हा प्रकार सुरूच ठेवला. यावेळी गायकवाड यांनी एसटी स्थानक प्रमुखांना देखिल याची माहीती मात्र यावर काहीच कार्यवाही झाली नाही.
ज्यांनी या महिलांना समजावण्याचा प्रयत्न केला, त्यांना उलट पोलिसात तक्रार करण्याची धमकी संबंधित देत होती. त्यामुळे नागरिक दुर्लक्ष करत होते. अखेर, शुक्रवारी गायकवाड व इतर रहिवाशांनी एकत्र येऊन महिलेला इशारा दिला. या घटनेचा एक व्हीडीओ प्रसारमाध्यमांवर झळकल्यानंतर महिलेला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तिने चिमुकल्यांच्या गळ्यातील साखळी काढून तिथून पळ काढला.
महिला स्वतःचे व मुलांचे उदरनिर्वाहासाठी भंगार गोळा करत होती, मात्र पोटच्या मुलांना साखळीने बांधण्याचा अमानुष प्रकार सर्वांनाच असह्य वाटला. या घटनेमुळे समाजात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित महिलेविरोधात योग्य कारवाई होण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
समाजातील मतमतांतरे
संबंधित महिला ही राहुरी तालुक्यातील असल्याचं समजतय. तर आपल्या दोन्ही मुलांच आणि स्वताःच पोट भरण्यासाठी तिला मन कठोर आणि माया बाजूला ठेवावी लागत असल्याच काहींच म्हणण आहे. मुलांचे लाड आणि माया देखिल संबोधित महिला करत असल्याच काही व्यक्ती सांगताय मात्र याच बरोबरीनं पोटच्या मुलांना साखळदंडाच ठेवण देखिल चुकीच असून तिच्या कारवाई व्हावी असा देखिल मत प्रवाह समोर येत आहे.