शिर्डी, श्रीरामपुर : राज्यात साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणारी वाहने नियमबाह्य पद्धतीने चालवली जात असून त्यामुळे अपघात घडत आहेत. बेकायदेशीर ऊस वाहतुकीचा सध्या पेव फुटला असून श्रीरामपुर (shirampur rto) आरटीओ विभाग आणि पोलीस साखर पेरणीमुळे अतीगोड झाल्यानं बिनबोभाट सर्रास साखर कारखाने (sugar factory) आपल्या आर्थिक फायद्यासाठी ट्रक ऐवजी ट्रॅक्टर, डबल ट्रॉली, जुगाड आदींच्या सहाय्याने ऊस वाहतूक करत आहेत.
पारंपरिक पद्धतीला फाटा नव्या जुगाडचा उदय
पुर्वी ऊस वाहतूक करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने बैलगाडीचा वापर केला जात. त्यानंतर ट्रॅक्टर, ट्रक मधून ऊस वाहतूक केली जावू लागली. यात अनेकदा क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरल्यानं आरटीओ विभाग करवाई देखिल करत असे. मात्र अलीकडील काळात तर कहर झाला असून ट्रक ऐवजी ट्रॅक्टरला दोन-दोन जुगाड जोडून उसाची वाहतूक केली जात असून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. तर श्रीरामपुर परिवहन विभागाने हाताची घडी तोंडावर पट्टी बांधून घेतली आहे. त्यामुळे अपघात वाढल्याचे चित्र दिसत आहे. परिवहन विभाग व ऊस साखर कारखाने आदीनी नागरिकांच्या जिवाशी खेळणे थांबवावे अशी मागणी जिल्हाभर केली जात आहे.

बैलांचा मुक्काम कत्तलखाण्यात?
साखर कारखाने सुद्धा ट्रक ऐवजी डबल टॅक्टर टॉलीचे प्रति टन पर किलोमीटर अवैध करार करताना आढळत आहे. त्यांमुळे शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल देणारा ट्रक उद्योग व व्यावसाईक संपत चालले आहे. याच बरोबर बैलांची गाडीच आता ट्रॅक्टरला जुंपल्यानं अनेक बैल कामा अभावी खाटकांच्या दारात जावून पोहचल्याच सत्य आहे.
साखर कारखान्याची साखर पेरणी
अवैध पद्धतीने बैलगाडीचा जुगाड टॅक्टरला वापरुन मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या ऊस वाहतूक केली जात आहे. याला साखर कारखाने व परिवहन विभाग जबाबदार आहे. मोठ्या प्रमाणात गाण्यांचा आवाज अप्रशिक्षित आणि नशेत चालक, मागील पुढील वाहनाकडे जाणीव पूर्वेक दुर्लक्ष यामुळे अपघाताचे प्रमाण वाढून अनेक निरपराध सर्वसामान्य नागरिकांना मृत्यू तसेच काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे.

श्रीरामपुर आरटीओ चे दुर्लक्ष
उसाची बेकायदेशीर वाहतूक सुरू असताना त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या आरटीओ विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. पोलिस प्रशासनाकडून या गाडी मालकांना रेडिअम लावण्याच्या सूचना करूनही त्या पाळल्या जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे बेजबाबदार व अवैध वाहतूक करणाऱ्या या ट्रॅक्टर चालकांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी नागरिक होत आहे.
वाहनधारकांचा जीव धाक्यात
दोन ट्रॉल्या जोडलेल्या ट्रॅक्टरला मागून येणाऱ्या वाहनधारकाला ओव्हरटेक करताना त्रास होतो. त्या टॉली आणि ट्रॅक्टरला ओव्हरटेक करेपर्यंत समोरून वाहतन येते. त्यामुळे या वाधनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागू शकते. त्यातच दोन ट्रॉल्यांचे वजन 20 टनांपेक्षा जास्त असल्याने गतिरोधक ओलांडत असताना, किंवा चढावरून असे वाहन नेताना अपघात होण्याची दाट शक्यता असते.