Breaking News
शिर्डीतून मोठी घोषणा: नाशिकच्या 2027 च्या कुंभमेळ्यात शिर्डी साईबाबांच्या नावाने नवीन आखाडा! Shirdi | ग्रो मोअर घोटाळा : ‘ही फसवणूक नाही, गुंतवणुकीचा व्यवहार’ - आरोपीच्या वकिलांचा दावा Shirdi News | शिर्डी साईचरणी 6.31 कोटींचं महादान! शिर्डीतील ‘ग्रो मोअर’ प्रकरणातून शिकण्यासारख्या 10 गोष्टी ! कुठं चूक झाली? Shirdi News | ‘ग्रो मोर’चा ‘नो मोर’ घोटाळा! शिर्डीकरांची कोट्यवधींची फसवणूक.. Shirdi News | शिर्डीत साईचरित्र ग्रंथांचा तुटवडा; सहा महिन्यांपासून विविध भाषांतील ग्रंथ उपलब्ध नाही... Shirdi News | शिर्डी साईबाबांची बदनामी करणाऱ्यांना न्यायालयाचा दणका Ahilyanagar Fake Note Crime |राहुरीत बनावट नोटा प्रकरण उघडकीस : 66 लाखांसह तिघांना अटक.. Koparagoan | कोपरगावात बिबट्याच्या जबड्यातून आजोबांनी वाचवला चार वर्षांचा नातू! Shaheed Sandip Gaikar | शहीद संदीप गायकर यांना अखेरचा निरोप; ब्राह्मणवाडा गावात शोकसागर पाकिस्तानप्रेमींना दहशतवाद्यांच्या हवाली करा; शिर्डीत मंत्री विखेंचा स्फोटक घणाघात Shirdi | शिर्डीत बनावट पोलीस अधिकारी अटकेत, श्रीरामपुरचा जग्गू इरानी अखेर धरला Shirdi Trust Update | शिर्डी साई संस्थानवर प्रशासकीय समितीची स्थापना Shirdi News | शिर्डीत देणगीदारांसाठी नवीन धोरण, व्हीआयपी रकमेची मर्यादा घटवली
25.1 C
Maharashtra
Saturday, August 30, 2025

Cricketer Suryakumar Yadav | सुर्यकुमार यादव सपत्नीक साईचरणी..

- Advertisement -

Cricketer Suryakumar Yadav Visits Shirdi : भारतीय T20 क्रिकेट संघाचा कर्णधार तथा ज्यांन अत्यंत शिताफीन कॅच घेवून आपला ठसा उमठवणारा फलंदाज सूर्यकुमार यादव बुधवारी सपत्नीक शिर्डीत येत साई बाबांच्या चरणी लीन झाला. आपल्या पत्नी सोबत सुर्यकुमारनं साईबाबा समाधीच मनोभावे दर्शन घेतलं. दर्शनानंतर त्यानं माध्यमांशी संवाद साधताना आत्ता पर्यंतच यशा बद्दल साईंचे आशीर्वाद घेत धन्यवाद मानले असल्याच सांगीतलं.

भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवनं पत्नी देवीशा शेट्टी समवेत बुधवारी माध्यन्ह आरतीनंतर शिर्डीत साईंच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. दर्शनानंतर साईबाबा संस्‍थानच्‍या वतीनं मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सूर्यकुमार यादवचा सत्‍कारही केला.

साईबाबांच्या दर्शनानंतर साई सभाृहात सूर्याकुमारनं प्रसार माध्यमांनी संवाद साधला यावेळी त्यानं सांगितलं की, “आजपर्यंत साईबाबांनी दिलेल्या यशाबद्दल आज बाबांना धन्यवाद देण्यासाठी शिर्डीला आलो. यापुढंही अशीच मेहनत करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना साईबाबाकडे केली आहे. या व्यतिरिक्त बाबांकडे जे मागितलं ते तुम्हाला सांगणार नाही” असंही सूर्यकुमारनं सांगितलं. अनेक दिवसांपासून यायचं होत, पण येता आलं नाही. आता बायको म्हणाली बाबांनी बोलावलंय तर दर्शनाला आल्याचं सूर्यानं सांगितलं.

जानेवारी महिन्यातच इंग्लंडविरुद्ध T20 ची मालिका होत आहे. यावर बोलतांना सूर्या म्हणाला की, “त्याची तयारी आता साई दर्शनानंतर सुरु करु. आज इथं आलो आहे. इथं येवून मनात चांगले विचार येतात. अशाच संधी या पुढं काही करण्यासाठी मिळाल्यातर चांगलच आहे. त्यासाठी मेहनत करायला हवं, जे मिळायचं ते पुढे मिळत राहील.” यावेळी स्काय या टोपणनावाबद्दल सूर्याला विचारलं असता ते तर माझ्या पत्नीलाच माहीत असून माझं नाव मोठं असल्यानं ती ‘स्काय’ नावानं मला बोलवत असल्याचं मिश्कील उत्तर त्यानं दिलं.

ग्रामीण भागात देखिल खुप टॅलेंट असून अलिकडे क्रिकेट मध्ये सर्वच भागातून मुल येताय, संधी खुप आहे त्याच बरोबरीनं मेहनत देखिल महत्वाची असल्याच सुर्यकुमारनं स्पष्ट केल.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
315,632SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles