शिर्डी : शिवसेनेत आपण एक दोन नव्हे तर 39 वर्षे काम केलय. चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच काम असल्यानं पक्ष आवळत चाललाय, पुढच्या निवडणुकी पर्यंत शिवसेना पक्ष राहणार नसल्याचा खळबळजनक दावा भाजपचे खासदार नारायण राणे (narayan rane) यांनी शिर्डीत रामनवमी निमित्तानं केला.
कोणाचे नाव घेतायत , विकास समृद्धी हे उद्धव ठाकरेचे काम नाही. विरोधकांना शिव्या घालणे अन चांगल्या कामात विघ्न आणण्याचे काम उद्धव ठाकरे करत असल्याची घणाघात टीका भाजपा खासदार नारायण राणे यांनी शिर्डीत केली.
भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी आज श्रीरामनवमी निमित्ताने सहपत्नीक शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आहे. साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतलाय. विधायक सामाजिक विकास कामांची विचार सारणी उद्धव ठाकरे यांची नाही. 39 वर्षा मी उद्धव ठाकरे बरोबर कायम केलेय. बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी पक्षा होता. साहेब गेले आणि शिवसेना संपली असल्याचही नारायण राणे म्हणाले आहे.
संजय राऊत सकाळी उठल्यावर घरा बाहेर मीडियाला बोलून दुकाना चालवतो. संजय राऊतने आपले कर्तव्य सांगावे देशासाठी राज्यासाठी आणि स्वतःचा गावासाठी काय योगदान आहे. संजय राऊतचा कुठल्याही भाष्याला मी उत्तर देणार नाही. संजय राऊताला मूर्ख माणूस समजत असल्याचही राणे यावेळी म्हणाले आहे. संजय राऊतचे प्रत्येक वक्तव्य वाद निर्माण करणारे आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना बद्दल केलेल्या व्यक्तव्यावर बोलतांना , कोकाटे यांनी शेतकऱ्यांना बदल व्यक्त केले मत चुकीचे आहे. असेही राणे म्हणाले आहे.