Nagar Palika Election | नगरपालिका निवडणूक; 'या' तारखेला होणार निवडणूक..
राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आयोगाने पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
Nagar parishad Election : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची राज्यभरातील मतदार आतुरतेने वाट पाहत होते, त्या निवडणूक कार्यक्रमाची अखेर राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आयोगाने पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
Maharashtra Local Body Elections 2025
Nagar Palika Election Date Announced
घोषित कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रभरातील नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी मतदान पार पडणार आहे, तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकांचे निकाल १० डिसेंबर २०२५ रोजी जाहीर केले जातील.
निवडणूक कार्यक्रम असा
- अर्ज दाखल करण्याची तारीख: १० नोव्हेंबर २०२५
- अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत: १७ नोव्हेंबर २०२५
- छाननीची तारीख: १८ नोव्हेंबर २०२५
- माघार घेण्याची अंतिम मुदत: २१ नोव्हेंबर २०२५
- अपील नसलेल्या ठिकाणी अंतिम मुदत: २५ नोव्हेंबर २०२५
- निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम यादी जाहीर: २६ नोव्हेंबर २०२५
- मतदानाचा दिवस: २ डिसेंबर २०२५
- मतमोजणीचा दिवस: ३ डिसेंबर २०२५
या निवडणुकांमधून २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी एकूण ६,८४९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. यंदा १० नव्या नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात येणार असून २३६ नगरपरिषदांची मुदत संपली आहे.
राज्यातील ४७ नगरपंचायतींपैकी ५ नगरपंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही, तर उर्वरित ४२ नगरपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. यापैकी २७ नगरपंचायतींची मुदत संपली असून १५ नव्या नगरपंचायतींचा यंदा समावेश झाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी निवडणूक रणधुमाळीची तयारी सुरू केली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेच्या समीकरणांवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.