Nilesh Lanke | स्वराज्याच्या गडरक्षणाची जबाबदारीही आपली- खासदार निलेश लंके | Ahilyanagar News
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ जयघोष नको, तर त्यांच्या गडरक्षणाची जबाबदारीही आपलीच आहे,” असा ठाम संदेश खासदार निलेश लंके (Nilesh Lanke Ahilyanagar) यांनी शनिवारी विश्रामगड (Vishram Gad) (पट्टा किल्ला) येथे दिला. आपल्या मावळा संघटनेच्या माध्यमातून सुरू केलेल्या शिवकालीन किल्ले जतन व स्वच्छता मोहिमेचा सातवा टप्पा ऐतिहासिक पट्टा किल्ल्यावर हजारो तरुण-तरुणींच्या उपस्थितीत पार पडला.
अकोले : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ जयघोष नको, तर त्यांच्या गडरक्षणाची जबाबदारीही आपलीच आहे,” असा ठाम संदेश खासदार निलेश लंके (Nilesh Lanke Ahilyanagar) यांनी शनिवारी विश्रामगड (Vishram Gad) (पट्टा किल्ला) येथे दिला. आपल्या मावळा संघटनेच्या माध्यमातून सुरू केलेल्या शिवकालीन किल्ले जतन व स्वच्छता मोहिमेचा सातवा टप्पा ऐतिहासिक पट्टा किल्ल्यावर हजारो तरुण-तरुणींच्या उपस्थितीत पार पडला.
हजारो मावळ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
शनिवारी सकाळीच “आपला मावळा” या विशेष टी-शर्टमधील तरुण-तरुणी हातात फावडे, कुदळ, झाडू घेऊन छत्रपतींच्या जयघोषात किल्ल्याकडे रवाना झाले. दिवसभर कचरा निर्मूलन, झाडे-झुडपे काढणे, वृक्षारोपण, तसेच पर्यटकांसाठी बेंच, डस्टबिन आणि सौरदिवे बसविण्याची कामे उत्साहात पार पडली.
लंके यांचा स्वच्छतेत थेट सहभाग
खासदार लंके यांनी स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. लोकप्रतिनिधी म्हणून “टीका-टिपण्णीपेक्षा प्रत्यक्ष कृतीला अधिक महत्त्व आहे,” असे ते यावेळी म्हणाले.
उपस्थित मान्यवर
या उपक्रमात डॉ. जयश्री थोरात, प्रभावती घोगरे, अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुरेश गडाख, जिल्हा वारकरी संघ अध्यक्ष बाळासाहेब भांगरे, प्रदेश सरचिटणीस विनोद हांडे, तसेच उमेश डावरे, दत्ता अस्वले, संतोष वारे, आबा पवार, रामेश्वर निमसे, सिताराम काकडे, बाळासाहेब हराळ, नितीन धांडे, मोहिनी काश्मीरी, समीर वडगे यांच्यासह हजारो मावळ्यांनी सहभाग घेतला.
शिवनेरीपासून विश्रामगडापर्यंत
“आपला मावळा” संघटनेची ही अनोखी किल्ले जतन व स्वच्छता मोहीम शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झाली होती. आतापर्यंत धर्मवीर गड, रायरेश्वर, रामशेज, तिकोना, प्रतापगड येथे ही मोहीम राबविण्यात आली असून सातव्या टप्प्यात ती विश्रामगड (पट्टा किल्ला) (Patta fort - Vishramgad) येथे पोहोचली आहे.