Mumbai Job | नवी मुंबई महानगरपालिकेत 132 पदांची भरती; पाहा ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख!
नवी मुंबई महानगरपालिकेत गट-अ, ब आणि क संवर्गातील विविध पदांसाठी एकूण 132 रिक्त जागांची नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आयुक्त, महापालिका उपसचिव, सहाय्यक विधी अधिकारी तसेच कनिष्ठ अभियंता (विद्युत व यांत्रिकी) पदांचा समावेश आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2026 आहे. पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीनुसार अर्ज करावा.
नवी मुंबई | नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये (NMMC) अधिकारी, अभियंता आणि वैद्यकीय विभागातील विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 132 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली (Navi Mumbai Mahanagarpalika Bharti) जाणार असून गट-अ, गट-ब आणि गट-क संवर्गातील पदांचा यामध्ये समावेश आहे.
ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार असून (Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2026) अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2026 आहे.
वैद्यकीय व पशुवैद्यकीय पदे – 113 जागा
नवी मुंबई महानगरपालिकेकडून पुढील वैद्यकीय (Online Application) पदांसाठी भरती होणार आहे –
-
वैद्यकीय तज्ञ / अधिकारी
(वैद्यकीय विशेषज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ) -
रक्त संक्रमण अधिकारी
-
फुफ्फुसरोग व क्षयरोग विशेषज्ञ
-
कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी
-
पशुवैद्यकीय अधिकारी
एकूण रिक्त जागा : 113 (Navi Mumbai Jobs 2026)
प्रशासकीय पदे
-
सहाय्यक आयुक्त – 5 जागा
-
महापालिका उपसचिव – 1 जागा
-
सहाय्यक विधी अधिकारी – 1 जागा
अभियंता पदे
-
कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 8 जागा
-
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – 4 जागा
एकूण पदे : 132
शैक्षणिक पात्रता
-
वैद्यकीय / वैद्यकीय तज्ञ : MD / MBBS / पशुवैद्यकीय पदव्युत्तर पदवी
-
सहाय्यक आयुक्त : कोणत्याही शाखेतील पदवी
-
महापालिका उपसचिव व सहाय्यक विधी अधिकारी :
विधी शाखेतील पदवी + किमान 3 वर्षांचा अनुभव -
कनिष्ठ अभियंता (विद्युत) : विद्युत अभियांत्रिकी पदवी
-
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) : यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
भरती जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रतेनुसारच उमेदवारांची निवड होणार आहे.
वयोमर्यादा
-
01 डिसेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असावे
-
मागासवर्गीय व अनाथ उमेदवारांना 5 वर्षांची सूट
अर्ज शुल्क
-
खुला प्रवर्ग : ₹1000
-
मागासवर्गीय / अनाथ / दिव्यांग / EWS : ₹900
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/Index.html