विमान अपघातात खळबळजनक खुलासा; विमान खाली उतरव....पायलटला आतून कोणी सूचना दिली?
प्राथमिक तपासाबाबत दिलेल्या माहितीनुसार रन वे दिसत नसतानाही पायलटने विमान खाली कोणाच्या सांगण्यावरून घेतले , याबाबत मोठा खुलासा केला आहे. लँडिंग सीक्वेन्स दरम्यान झालेल्या चुकीच्या निर्णयामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर चार जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुणे | उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या चार्टर्ड विमानाच्या अपघातामागील (Ajit Pawar plane crash) प्रमुख कारण खराब हवामान आणि कमी दृश्यमानता असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या दुर्घटनेनंतर अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं असून, तपासादरम्यान काही धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.
तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रनवे स्पष्ट दिसत नसतानाही विमान लँडिंगसाठी खाली घेण्यात आल्याचा ( Baramati runway visibility) मोठा खुलासा झाला आहे. लँडिंग सीक्वेन्स दरम्यान घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे ही दुर्घटना (Baramati aircraft accident) घडल्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीत लँडिंगच्या काही मिनिटांपूर्वीच हे विमान अपघातग्रस्त (Baramati aircraft accident) झाले. अपघातावेळी बारामती विमानतळ परिसरात दाट धुके पसरले होते. त्यामुळे दृश्यमानता अवघी सुमारे 800 मीटर इतकीच होती.
या प्रतिकूल परिस्थितीत वैमानिकाने विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने (ATC) पहिल्या प्रयत्नात वैमानिकाला धावपट्टी दिसत आहे का, अशी विचारणा केली असता वैमानिकाने नकारात्मक उत्तर दिले. त्यानंतर विमानाने हवेत गिरकी घेतली.
दुसऱ्या प्रयत्नात एटीसीकडून पुन्हा विचारणा करण्यात आली असता, यावेळी वैमानिकाने धावपट्टी दिसत असल्याचे सांगितले. त्यानंतर एटीसीकडून लँडिंगची परवानगी देण्यात आली. मात्र लँडिंगदरम्यानच विमानाचा अपघात झाला.
दरम्यान, तपास अधिकाऱ्यांकडून कॉकपिटमधून कोणाच्या तरी सूचनेनंतर कमी दृश्यमानतेत लँडिंगचा निर्णय घेण्यात आला का, या दिशेनेही सखोल तपास सुरू आहे. प्रथमदर्शनी, विमान उतरवताना वैमानिकाचा अंदाज चुकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या गंभीर दुर्घटनेमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी तपास यंत्रणा विविध अंगांनी चौकशी करत असून, अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.