शिर्डी साईबाबांच्या दरबारी दानाचा पाऊस; एका दिवसात 3 कोटी 18 लाखांचं महादान

शिर्डीतील साईबाबांच्या दरबारी अवघ्या एका दिवसात 3 कोटी 18 लाख रुपयांचं महादान अर्पण करण्यात आलं. अमेरिकेत वास्तव्य असलेल्या गुजरातमूळ राज आणि अंकिता पटेल यांनी सव्वा कोटींचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण केला, तर युनियन बँकेने CSR फंडातून 1 कोटी 93 लाख रुपयांची देणगी वैद्यकीय सुविधांसाठी दिली. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी असून साईमंदिरात दानाचा आलेख सातत्याने वाढत आहे.

Jan 25, 2026 - 23:14
Jan 25, 2026 - 23:19
शिर्डी साईबाबांच्या दरबारी दानाचा पाऊस; एका दिवसात 3 कोटी 18 लाखांचं महादान
NRI Devotees from USA Donate ₹1.25 Crore Gold Crown to Sai Baba

शिर्डी: साईबाबांच्या दरबारी (Shirdi Sai Baba) आज दानाचा अक्षरशः पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं. अवघ्या एका दिवसात दोन दानशूर भाविकांनी तब्बल 3 कोटी 18 लाख रुपयांचं महादान साईचरणी अर्पण (Shirdi Donation) केल्याची माहिती समोर आली आहे. सलग सुट्ट्यांचा योग आणि भाविकांची वाढती श्रद्धा यामुळे साईमंदिरात दानाचा आलेख लक्षणीयरीत्या वाढताना दिसतोय.

अमेरिकास्थित भाविकांकडून सव्वा कोटींचा सुवर्ण मुकुट अर्पण

NRI Devotees from USA Donate ₹1.25 Crore Gold Crown to Sai Baba

मूळ गुजरातचे मात्र सध्या अमेरिकेत वास्तव्य असलेले राजेंद्र पटेल आणि अंकिता पटेल या दानशूर भाविकांनी साईबाबांना तब्बल सव्वा कोटी रुपयांचा आकर्षक सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे. नक्षीकाम आणि मोरपीसांनी सजवलेला हा मुकुट आज धुपारतीदरम्यान साईबाबांना विधीवत चढवण्यात आला. या प्रसंगी साईमंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झालं होतं.

Donation Shower at Shirdi Sai Temple; ₹3.18 Crore Offered in a Single Day

युनियन बँकेकडून CSR फंडातून 1 कोटी 93 लाखांची देणगी

Union Bank Contributes ₹1.93 Crore from CSR Fund for Medical Facilities at Shirdi

त्याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया कडून आपल्या CSR (Corporate Social Responsibility) फंडातून साई संस्थानला 1 कोटी 93 लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे. ही रक्कम साई संस्थानच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधांच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे.

सलग सुट्ट्यांचा परिणाम; साईनगरी भाविकांनी फुलली

शनिवार, रविवार आणि प्रजासत्ताक दिन अशा तीन दिवसांच्या सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सामान्य भाविकांकडूनही मोठ्या प्रमाणात रोख, सोने आणि चांदी स्वरूपात दान होत असताना, आज दोन दानशूर भाविकांनी साईचरणी भरभरून दान दिल्याचं चित्र आहे.

‘एका हातानं दिलं तर हजारो हातानं परत’ – भाविकांची श्रद्धा

साईबाबा मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात, तसेच बाबांना एका हातानं दिलं तर बाबा हजारो हातानं भरभरून देतात, अशी भाविकांची दृढ धारणा आहे. याच श्रद्धेमुळे दिवसेंदिवस साईबाबांच्या चरणी सोने, चांदी आणि रोख स्वरूपातील दानात सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. भाविकाकडून दानात आलेला सुवर्ण मुकुट देशाच्या प्रजासत्ताक दिनाला (Republic Day Holidays) साईबाबांच्या मुर्तीला परिधान केला जाणार असल्याचं साई संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केल आहे.

साई संस्थानकडून भाविकांचा सत्कार, विविध योजना राबविण्यात

या महादानाबद्दल साई संस्थानच्या वतीने दानशूर भाविकांचा सत्कार करण्यात आला. सामान्य भाविकांसह दानशूर भाविकांसाठीही साई संस्थान विविध योजना राबवत आहे.
यामध्ये साई पादुका दर्शन सोहळा, भाविकांसोबत हितगुज, तसेच समाधानकारक आणि सुलभ साईदर्शन व्यवस्था यांचा समावेश आहे.

1 जानेवारी 2026 पासून गर्दी आणि दानात लक्षणीय वाढ

साई संस्थानच्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2026 पासून साईमंदिरात भाविकांची गर्दी तसेच दानात मोठी वाढ नोंदवली जात आहे. सुलभ दर्शन व्यवस्था, शिस्तबद्ध नियोजन आणि भाविकांचा वाढता विश्वास यामुळे शिर्डी साईमंदिरात श्रद्धेचा ओघ अधिकच वाढताना दिसतोय.

YOUTUBE

FACEBOOK

Manish Manish Dawange is a passionate journalist dedicated to truthful, people-centric reporting. He focuses on ground realities, social issues, and impactful stories that give voice to the unheard.