साईभक्त अजित पवार यांच शेवटचं साईदर्शन; साईबाबांचा एक निस्सिम भक्त हरपला! | Ajit Pawar Last Shirdi Sai Darshan
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शिर्डीशी विशेष भावनिक नातं. त्यांचे आजोळ अहिल्यानगर जिल्ह्यात असल्याने लहानपणापासूनच या भागात त्यांचे येणं-जाणं. बालपणी नातेवाईकांसोबत तर पुढे राजकीय जीवनात विविध दौऱ्यांच्या निमित्ताने अजित पवार हे शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून येत असत.
Ajit Pawar Sai Devotee | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास अपघाती निधन झाले. त्यांचा या अकाली जाण्यानं अवघा महाराष्ट्र हळहळला. त्याच प्रमाणे साईच्या नगरी सोबत देखिल त्यांच्या अनेक आठवणी आहेत. दादांचा वादा जसा पक्का होता तसेच ते एक निस्सिम साईभक्त देखिल होते. दादांच आजोळ अहिल्यानगर जिल्ह्यात असल्यानं लहानपणापासूनचं त्यांच या भागात येणं होत. लहानपणी नातेवाईकांसोबत तर आता राजकीय दौ-या दरम्यान ते अवर्जून शिर्डीत साईबाबा समाधीचं दर्शन घेत. अलिकडेच कोपरगाव नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारासाठी अजित दादा यांनी शिर्डीत साईबाबा समाधीची पाद्य पुजा करत दर्शन घेतलं होतं.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शिर्डीशी (Ajt Pawar Last Shirdi Saibaba Darshan) विशेष भावनिक नातं. त्यांचे आजोळ अहिल्यानगर जिल्ह्यात असल्याने लहानपणापासूनच या भागात त्यांचे येणं-जाणं. बालपणी नातेवाईकांसोबत तर पुढे राजकीय जीवनात विविध दौऱ्यांच्या निमित्ताने अजित पवार हे शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून येत असत.
राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी असोत, निवडणुकीचा प्रचार असो किंवा शासकीय दौरे अजित पवार यांचा अहिल्यानगर जिल्ह्यात दौरा ठरला की शिर्डी साईबाबा समाधी दर्शन हे निश्चित. गेल्या दोन-तीन वर्षांत त्यांनी अनेकदा शिर्डी साईमंदिरात हजेरी लावत मनोभावे दर्शन घेतलं होतं.
अलिकडेच कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असताना अजित पवार यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीवर पाद्यपूजा करत दर्शन घेतले होते. यावेळी त्यांनी साईबाबांच्या चरणी मनोभावे प्रार्थना करत, “राज्यातील शेतकऱ्यांना चांगलं पीक मिळू दे, महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम होऊ दे,” अशी भावना व्यक्त केली होती. साईमंदिरात आल्यानंतर मनाला समाधान आणि शांतता मिळते, असं ते अनेकदा सांगत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, (PM Narendra Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबतच्या दौऱ्यांदरम्यान, विधानसभा निवडणूक प्रचार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या काळात तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी शिर्डीत येवून साईबाबांचे दर्शन घेतल्याची नोंद आहे.
कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्यावर अजित पवार यांचे विशेष प्रेम, त्यांच्या आग्रहामुळेही दादांचे अहिल्यानगर जिल्ह्यातील दौरे अधिक वाढत. नगर जिल्ह्यात कार्यक्रम ठरला की शिर्डी साईसमाधी दर्शन हा त्या दौऱ्याचा अविभाज्य भाग असत
अलिकडे कोपरगाव येथील प्रचारसभेत बोलताना अजित पवार यांनी शिर्डी आणि साईबाबांचा पवित्र तिर्थक्षेत्राचा उल्लेख करत साईदर्शनानंतर नवीन उर्जा असल्याचं म्हणटलं होतं, “विकास आणि कामावर बोला, टीका-टिप्पणी टाळा,” असा स्पष्ट संदेश दिला होता. कामाला देव मानणारे, निर्णयक्षम आणि शिस्तप्रिय नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांची साईभक्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक शांत, श्रद्धावान पैलू म्हणून ओळखली जाते.
मुंबईहून बारामतीकडेे जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी येत असताना बुधवारी विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचे (Ajit Pawar Palne Crash) निधन झाले. यानंतर संपूर्ण राज्यभर शोकाकुल वातावरण पसरले. अजित पवारांचा मृतदेह बारामती येथील पुण्यश्लोेक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला होता. गुरुवारी सकाळी अजित पवार यांचे पार्थिव सकाळी आठच्या सुमारास काटेवाडी येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या घरातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली.
बारामती येथील पेन्सिल चौकातून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांना आणण्यात आले. त्यावेळी जमलेल्या लाखोंच्या जनसमुदायांच्या मुखातून, ‘अजित दादा अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी उपस्थित अनेकांना त्यांचे अश्रू अनावर झाले होते. ‘दादा परत या... परत या...’ अशा घोषणादेखील उपस्थित जनसमुदायांकडून वारंवार देण्यात येत होत्या. शिर्डीच्या साईबाबांचा एक श्रद्धावान भाविक अखेर हरपला, कामाचा माणूस म्हणून दादांची ख्वाती होती, देव दर्शन करताना देखिल येथे काय नवीन करता येईल याकडे त्यांचा कल असायचा. आज अखेर दादांचा शेवटचा वादा अंनतात विलीन झाला हेच परम सत्य आहे.