Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा; तर सरकारचं अवघड होईल
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आपले सर्व दौरे रद्द करून तातडीने पुण्याकडे रवाना झाले. MPSC उत्तीर्ण एक ते दीड लाख विद्यार्थ्यांना होत असलेल्या अन्यायाविरोधात थेट भेट घेण्यासाठी ते पुण्यात जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न आणि बिबट्यांच्या हल्ल्यांवरही त्यांनी सरकारची जबाबदारी अधोरेखित केली.
Manoj Jarange | मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपले सर्व नियोजित दौरे रद्द शिर्डीत साईदर्शनासाठी पोहचले. मध्यान्ह आरतीनंतर जरांगे पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह मनोभावे साईदर्शन घेत शेतकरी आणि राज्यातील नागरीकांसाठी साईंना साकडे घातले. जरांगे पटील साईदर्शनानंतर सर्व नियोजीत कार्यक्रम रद्द करत अचानक पुण्याकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, आज शिर्डी येथे त्यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर तात्काळ पुण्याचा रस्ता धरला. पुण्याकडे रवाना होण्यामागचं नेमकं कारण काय, याबाबत स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
साईबाबांच्या चरणी राज्यासाठी प्रार्थना
शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले,
“इंग्रजी नवीन वर्षाच्या निमित्ताने मी साईबाबांच्या चरणी दर्शनासाठी आलो होतो. राज्यातील जनता, शेतकरी सुखी-समाधानी राहावेत, हीच प्रार्थना साईबाबांकडे (MPSC Students Issue) केली आहे.”
पुन्हा आंदोलन होणार का? जरांगेंची स्पष्ट भूमिका
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येईल का, या प्रश्नावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले,
“मला वाटत नाही की पुन्हा आंदोलन करावं लागेल. विखे पाटलांनी जबाबदारी घेतली आहे आणि समाजाने मुख्यमंत्री तसेच विखे पाटलांवर विश्वास ठेवला आहे. मराठवाड्यासाठी जीआर निघालेला असून त्याच धर्तीवर पुढील कामकाज होईल, असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. मात्र, तशी वेळ आली तर सरकारचं अवघड होईल. मला समाजापेक्षा मोठं कोणी नाही.”
पुण्याकडे तातडीने जाण्याचं कारण काय?
मनोज जरांगे पाटील यांनी पुण्याकडे तातडीने रवाना होण्यामागचं कारण स्पष्ट करताना सांगितलं,
“मी माझे सर्व दौरे रद्द करून अचानक पुण्याकडे निघालो आहे. एक ते दीड लाख MPSC विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक, त्यांची काहीही चूक नसताना त्रास दिला जातोय. सरकारच्या चुकीमुळे जर इतक्या मोठ्या संख्येतील MPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडलं जात असेल, तर ही फार मोठी शोकांतिका आहे.
मी मुख्यमंत्र्यांच्या OSD सोबत आणि विखे पाटलांसोबत याबाबत चर्चा केली आहे. पुण्यात जाऊन प्रत्यक्ष MPSC विद्यार्थ्यांची भेट घेणार असून या गंभीर प्रश्नावर तातडीने मार्ग काढावा, असा निरोप मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला आहे.”
शेतकरी आणि बिबट्यांच्या हल्ल्यांवर सरकारवर जबाबदारी
राज्यात शेतकऱ्यांवर होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यांबाबत प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील म्हणाले,
“शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती किंवा बिबट्यांचे (Leopard Attacks) हल्ले झाले, तर ती सरकारची थेट जबाबदारी आहे. कारण राज्यातील जनतेचं पालकत्व सरकारने स्वीकारलेलं असतं. शेतकऱ्यांकडे ((Farmers Issues) कोणतीही यंत्रणा नसते, ती सरकारकडे असते आणि ती उपलब्ध करून देणं सरकारचं कर्तव्य आहे.
शेतकऱ्यांकडे एक महत्त्वाचं हत्यार आहे, मात्र तो त्याचा वापर करत नाही. शेतकऱ्यावर आत्महत्या किंवा किडनी विकण्याची वेळ येते, ही गंभीर बाब आहे. जो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेल, कर्जमुक्ती करेल, त्यालाच मतदान करायचं, हे शेतकऱ्यांनी ठरवलं पाहिजे.”
Manoj Jarange Shirdi Visit | मनोज जरांगे शिर्डीत साईचरणी लीन | Maratha Aarkshan @manojjarange @MarathaAarakshn @TheMarathaaa pic.twitter.com/1ppASQ8PcQ — SP24 TAAS (@Sp24N) January 2, 2026