Rahuri Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर; शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनानंतर मोठी अपडेट..

राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार कै. शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होण्याची शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण जाहीर केले आहे. हा कार्यक्रम १ जानेवारी २०२६ अर्हता दिनांकाच्या आधारे राबविण्यात येणार असून, मतदार नोंदणी, दुरुस्ती व हरकतींसाठी ठराविक कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

Dec 23, 2025 - 20:32
Rahuri Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर; शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनानंतर मोठी अपडेट..
rahuri assembly bypoll special electoral roll revision 2026

मुंबई | राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार कै. शिवाजी कर्डिले यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या 223- राहुरी विधानसभा (Rahuri Vidhan Sabha) मतदारसंघासाठी पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 21 अन्वये मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम 1 जानेवारी 2026 हा अर्हता दिनांक धरून राबविण्यात येणार आहे.

■ पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी

२२३-राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार कै. शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile Death) यांच्या आकस्मिक निधनामुळे मतदारसंघ रिक्त झाला असून, सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेणे निवडणूक आयोगावर (Election Commission of India) बंधनकारक आहे. त्यामुळे पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे.

■ निवडणूक आयोगाचा निर्णय


भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 21 अन्वये राहुरी मतदारसंघासाठी (Rahuri Politics) मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण जाहीर केले आहे. हा कार्यक्रम 1 जानेवारी 2026 हा अर्हता दिनांक धरून राबविला जाणार आहे.

■ आधीची निवडणूक आणि आमदारांचा कार्यकाळ


ऑक्टोबर 2024 मधील विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला होता. अल्प कालावधीत त्यांनी मतदारसंघातील विकासकामांवर भर दिला. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही काळ ते सार्वजनिक जीवनापासून दूर होते. 17 ऑक्टोबर 2025 रोजी आजारपणामुळे त्यांचे निधन झाले.

■ विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा कालावधी


मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण 29 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे.
3 जानेवारी 2026 रोजी एकात्मिक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

■ दावे-हरकती व अंतिम यादी


3 ते 24 जानेवारी 2026 दरम्यान दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत.
प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत केला जाणार आहे.
अंतिम मतदार यादी 14 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे.

■ मतदारांना आवाहन


या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ घेऊन पात्र नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्ती व पत्ता बदल यासंबंधी आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.