Ahilyanagar News | केंद्रीय गृहमंत्री दुस-यांदा विखे पाटलांच्या लोणीत येणार.. विविध प्रकल्पांच उद्घाटन

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा रविवार, ५ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि ग्रामीण विकासाचे अर्धव्यू, माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

Sep 30, 2025 - 22:31
Ahilyanagar News | केंद्रीय गृहमंत्री दुस-यांदा विखे पाटलांच्या लोणीत येणार.. विविध प्रकल्पांच उद्घाटन
Ahilyanagar Loni Amit Shah Visited File Photo

अहिल्यानगर : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा रविवार, ५ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि ग्रामीण विकासाचे अर्धव्यू, माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाचे लोकार्पणही होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूषविणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, “सहकार मंत्री म्हणून अमित शहा यांचा लोणी येथे हा दुसरा दौरा आहे. यापूर्वी त्यांनी राज्यातील पहिल्या सहकार परिषदेला हजेरी लावली होती. यावेळी प्रवरा परिवाराच्या निमंत्रणाला मान देऊन ते दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.”

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह महायुतीचे अन्य लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

दुपारी १२ वाजता प्रवरानगर येथे अमित शहा यांचे आगमन होईल. कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाचे उद्घाटन झाल्यानंतर ते लोणी गावात येऊन विखे दांपत्यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. दुपारी १ वाजता लोणी बाजारतळावरील सभास्थळी सर्व मान्यवरांचे आगमन होणार असून, या सभेत अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करतील.

दरम्यान, लोणी बाजारतळावर भव्य सभामंडप उभारण्यात आला असून, प्रवरा परिवाराच्या वतीने स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.

Manish Manish Dawange is a passionate journalist dedicated to truthful, people-centric reporting. He focuses on ground realities, social issues, and impactful stories that give voice to the unheard.