कोपरगावात रोटावेटरचे मृत्यूकांड; शेतात काम करताना शेतकऱ्याचा जागीच अंत

कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा परिसरातील खर्डी गणेश शिवारात शेतात काम करत असताना ट्रॅक्टरच्या रोटावेटरमध्ये सापडून 60 वर्षीय शेतकरी बाळनाथ उर्फ साहेबराव पुंजाबा रोहम यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. यंत्रात अडकलेला कचरा काढताना हा भीषण अपघात घडला. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून तालुक्यात शोककळा पसरली आहे. मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Jan 5, 2026 - 21:09
कोपरगावात रोटावेटरचे मृत्यूकांड; शेतात काम करताना शेतकऱ्याचा जागीच अंत
kopargaon rotavator accident farmer dies

कोपरगाव | तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. टाकळी फाटा परिसरातील खर्डी गणेश शिवारात शेतात काम करत असताना ट्रॅक्टरच्या रोटावेटरमध्ये (Tractor accident) सापडून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू (Farmer death Maharashtra) झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली.

या अपघातात बाळनाथ उर्फ साहेबराव पुंजाबा रोहम (वय 60) यांचा मृत्यू झाला असून ते खर्डी गणेश शिवार, ता. कोपरगाव येथील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहम हे आपल्या शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटावेटर मारत होते. यावेळी रोटावेटरमध्ये काही कचरा अडकला. तो कचरा काढण्यासाठी ते यंत्राजवळ गेले असता, अचानक त्यांचा हात यंत्रात अडकला. काही क्षणांतच ते रोटावेटरमध्ये सापडले आणि या भीषण अपघातात (Farming accident India) त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की मृतदेहाची अवस्था विदारक झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून तालुक्यात शोककळा पसरली आहे. दरम्यान, मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

या दुर्घटनेमुळे शेतातील यांत्रिक उपकरणांच्या वापरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Manish Manish Dawange is a passionate journalist dedicated to truthful, people-centric reporting. He focuses on ground realities, social issues, and impactful stories that give voice to the unheard.