Shrirampur Crime | श्रीरामपुर बंटी जहागीरदार हत्या प्रकरणातील दोघांना अटक..
श्रीरामपूर शहरात घडली नववर्षाच्या पुर्वसंध्येला बंटी जहागीरदार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर पोलीसांनी सीसीटिव्ही आणि विविध पथकांच्या माध्यमातून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. रवी निकाळजे आणि कृष्णा शिंगारे अशी आरोपींनी नावे समोर आली असून नाकांबदी दरम्यान पोलीसांनी या दोघांना अटक केल्याच सांगीतल जात आहे.
अहिल्यानगर | श्रीरामपुर येथे भरदिवसा असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार (वय 52) याची बुधवारी दुपारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही थरारक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात घडली नववर्षाच्या पुर्वसंध्येला घडली होती. यानंतर पोलीसांनी सीसीटिव्ही आणि विविध पथकांच्या माध्यमातून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. रवी निकाळजे आणि कृष्णा शिंगारे अशी आरोपींनी नावे समोर आली असून नाकांबदी दरम्यान पोलीसांनी या दोघांना अटक केल्याच सांगीतल जात आहे.
श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक 2 येथील रहिवासी असलेला बंटी जहागीरदार गुन्हेगारी पार्श्वभुमीचा असून सध्या जामिनावर बाहेर होता. बुधवारी दुपारी सुमारे 2.15 वाजण्याच्या सुमारास तो एका धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहून श्रीरामपूर येथील कब्रस्तानातून बाहेर पडत असताना, मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर दोन पिस्तुलांमधून बेछूट गोळीबार केला. हल्लेखोरांनी जाहगीरदार याच्या दिशेनं तीन गोळ्या झाडल्या यातील एक गोळी त्याला लागली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जहागीरदारला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अहिल्यानगर येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून, दरम्यान चोवीस तासाच्या आत रवी निकाळजे आणि कृष्णा शिंगारे यांना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का, नेमकं हल्ल्या मागच कारण काय? याचाही शोध घेतला जात पोलीसांकडून सांगीतल जात आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) दत्तात्रय कराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटी जहागीरदार हा कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्यावर अवैध वाळू उत्खनन, खंडणी, खून तसेच दहशतवादाशी संबंधित एकूण 18 गंभीर गुन्हे दाखल होते. विशेष म्हणजे, पुण्यातील जेएम रोड बॉम्बस्फोट प्रकरणात त्याचे नाव आरोपी म्हणून पुढे आले होते. याशिवाय, 2006 साली नाशिक येथे लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती लीक केल्याप्रकरणीही त्याला अटक करण्यात आली होती. या हत्येमुळे श्रीरामपूरसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. पुढील तपासातून हत्या मागील नेमका कट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Shrirampur Crime News | श्रीरामपूर मध्ये गोळ्या झाडून बंटी जहागीरदार यांची हत्या | SP24 Taas pic.twitter.com/sQvFhbOKe7 — SP24 TAAS (@Sp24N) January 1, 2026