Manoj Jarange Patil | “माझ्याकडे धनंजय मुंडेंची 22 प्रकरणं आहेत”; मनोज जरांगेंचा थेट इशारा..

Chhatrapati Sambhajinagar दौऱ्यात Maratha reservation activist Manoj Jarange Patil यांनी NCP leader Dhananjay Munde यांच्यावर गंभीर आरोप करत, “22 cases with me, don’t provoke me” असा थेट इशारा दिला. Allegations of threats, conspiracy, political backing and character assassination मुळे हा वाद अधिक तीव्र होत असून, राज्यातील political temperature पुन्हा वाढताना दिसत आहे.

Feb 17, 2026 - 20:08
Manoj Jarange Patil | “माझ्याकडे धनंजय मुंडेंची 22 प्रकरणं आहेत”; मनोज जरांगेंचा थेट इशारा..
Manoj Jarange Patil Vs Dhananjay Munde

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून राज्यभर चर्चेत असलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Statement) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde Controversy) यांच्यातील वाद (Jarange vs Munde  NCP Leader Allegations) पुन्हा एकदा उफाळून आला आहे. छत्रपती संभाजीनगर ( Chhatrapati Sambhajinagar Political News) दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आणि कडक आरोप करत थेट इशाराच दिला.

“माझ्याकडे 22 प्रकरणं आली आहेत, नादाला लागू नका”

धनंजय मुंडे यांचे माझ्याकडे 22 प्रकरणं आली आहेत. त्यामुळे शहाणे व्हा. इथून पुढे तरी माझ्या नादाला लागू नका,” असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला. आपण अद्याप कोणत्याही प्रकरणात हात घातलेला नाही, मात्र गरज पडली तर परिणाम गंभीर असतील, असा इशाराही त्यांनी दिला.

मंत्रिपदावरून जहरी टोला

धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत बोलताना जरांगेंनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली.
फक्त मंत्रिपद देणार म्हटलं होतं तरी अजित पवारांचा पक्ष ट्रोल झाला. दिलं तर पक्षच संपेल. भाजप कशाला रक्ताने हात भरलेल्या लोकांना सांभाळेल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “संतोष देशमुख यांना अजून न्याय मिळालेला नाही. त्यांचाच खून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून झाला, अशा व्यक्तीला मंत्रिपद द्यायचं का?” असा गंभीर आरोपही जरांगेंनी केला.

घातपात, सुपारी आणि बदनामीचे आरोप

मनोज जरांगे पाटील यांनी आणखी गंभीर आरोप करत म्हटले की, “घातपाताच्या सुपाऱ्या देऊन आमचेच लोक पुन्हा उचकवले जात आहेत. यामागे धनंजय मुंडेंची टोळी आहे, हे मला माहीत आहे.” आपल्याविरोधात लाभार्थी टोळी लावून बदनामी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

नागपूरहून आलेल्या महिलेचा धक्कादायक दावा

जरांगेंनी एका नागपूरहून आलेल्या महिलेचा उल्लेख करत खळबळजनक दावा केला. “आज सकाळी एक महिला माझ्या घरी रडत आली होती. तिचा नवरा या टेन्शनमुळे मरण पावला आहे. तिने सांगितलेलं प्रकरण अत्यंत भयानक आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी सावध राहावं,” असा इशारा त्यांनी दिला. “माझ्यावर केलेल्या प्रत्येक आरोपावर मी जर फौजदारी खटले दाखल केले, तर माझ्या विरोधात बोलणाऱ्यांना जेलची शिक्षा भोगावी लागेल. माझे काहीच प्रकरण नाहीत. पण तुमची 22 पेक्षा जास्त प्रकरणं माझ्याकडे आहेत,” असे ठणकावून सांगत जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राजकीय वातावरण तापणार

या थेट आणि कडक वक्तव्यांमुळे मराठा आरक्षण आंदोलनासोबतच राज्यातील राजकीय वातावरणही पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. जरांगे–मुंडे संघर्ष आता फक्त आरोप–प्रत्यारोपापुरता न राहता गंभीर वळण घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.