Rahata News | राहात्यात सुमथीनाथ जैन मंदिरात चोरीचा डाव उधळला..

राहाता शहरातील सुमथीनाथ जैन मंदिरात चोरीचा मोठा प्रयत्न फसला. Alert citizens आणि security guard यांच्या धाडसामुळे मंदिरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित राहिल्या. Police investigation started.

Feb 24, 2026 - 21:13
Feb 24, 2026 - 21:19
Rahata News | राहात्यात सुमथीनाथ जैन मंदिरात चोरीचा डाव उधळला..
राहात्यात सुमथीनाथ जैन मंदिरात चोरीचा डाव उधळला

राहाता : शहरातील धार्मिक आणि अत्यंत गजबजलेल्या परिसरात असलेल्या सुमथीनाथ जैन मंदिरात चोरी करण्याचा मोठा प्रयत्न (Rahata Jain Temple theft attempt) उघडकीस आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चौघा अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवळच वास्तव्यास असलेले डॉ.राजेंद्र पिपाडा ( Dr. Rajendra Pipada) आणि त्यांच्या अंगरक्षकाच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा हा डाव पूर्णपणे फसला असून, मंदिरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित राहिल्या आहेत.

रात्री तीन वाजता घडला थरार

ही घटना मंगळवारी रात्री तीन वाजेच्या सुमारास घडली. सुमथीनाथ जैन मंदिर हे शहरातील वर्दळीच्या भागात असतानाही चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत चोरीचा प्रयत्न केला. चार जणांच्या टोळीने मंदिराचे कुलूप तोडण्यास सुरुवात केली. मात्र, या दरम्यान झालेल्या आवाजामुळे परिसरात हालचाल झाली.

आवाजामुळे चोरीचा प्रयत्न उघडकीस

मंदिराजवळच वास्तव्यास असलेले डॉ.राजेंद्र पिपाडा यांना संशयास्पद आवाज ऐकू आल्याने ते तात्काळ (Rahata News) घराबाहेर आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी आपल्या अंगरक्षकाला देखील उठवले. दोघांनी मिळून मंदिराच्या दिशेने धाव घेतली.

अंगरक्षकाचे धाडस; चोरटे परतले

दरम्यान, मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांना अंगरक्षकाने मोठ्या धैर्याने थेट परतवून लावले. अचानक झालेल्या प्रतिकारामुळे चोरटे गोंधळले. दुसरीकडे, मंदिराच्या परिसरात अंधारात दबा धरून बसलेले उर्वरित दोन चोरटे आरडाओरडा सुरू होताच घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

मंदिरातील संपत्ती सुरक्षित

या संपूर्ण घटनेत कोणतीही चोरी घडली नाही. मंदिरातील दानपेटी, मौल्यवान मूर्ती किंवा इतर धार्मिक साहित्य पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, चोरीचा प्रयत्न झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

परिसरात खळबळ; नागरिकांतून कौतुक

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. गजबजलेल्या भागात अशा प्रकारचा चोरीचा प्रयत्न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, वेळेवर प्रसंगावधान दाखवणारे राजेंद्र पिपाडा आणि त्यांच्या अंगरक्षकाच्या धाडसाचं नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक केलं जात आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. चोरट्यांची संख्या, हालचाली आणि ते कोणत्या दिशेने पळाले याचा तपास पोलिस करत आहेत. तसेच याठिकाणी फॉरेंसिक टिमला देखिल पाचारण करण्यात आले. याठिकाणचे ठसे तसेच इतर नुमने त्यांनी घेतले. लवकरच आरोपींचा शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे राहाता शहरातील धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंदिर परिसरात अधिक सुरक्षा व्यवस्था, रात्री गस्त आणि सीसीटीव्ही यंत्रणा अधिक प्रभावी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.