टिपू सुलतान–शिवाजी महाराज तुलना वादावर सपकाळ नरमले; शब्द मागे घेत दिलगिरी, भाजपवर पलटवार

Maharashtra Congress president Harshwardhan Sapkal यांनी Tipu Sultan–Chhatrapati Shivaji Maharaj comparison controversy वर आपले शब्द मागे घेतले असून, Shiv bhakt sentiments hurt झाल्या असतील तर apology व्यक्त केली आहे. मात्र, भाजपकडून threats and political pressure असल्याचा आरोप करत, BJP opposition will continue असा ठाम पवित्रा त्यांनी पत्रकार परिषदेत मांडला.

Feb 17, 2026 - 20:23
टिपू सुलतान–शिवाजी महाराज तुलना वादावर सपकाळ नरमले; शब्द मागे घेत दिलगिरी, भाजपवर पलटवार
टिपू सुलतान–शिवाजी महाराज तुलना वादावर सपकाळ नरमले

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Maharashtra Congress president Harshwardhan Sapkal) यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज (Tipu Sultan Shivaji Maharaj Controversy) यांच्याशी करणाऱ्या वादग्रस्त विधानावरून राज्यात निर्माण झालेल्या तीव्र संतापानंतर अखेर आपले शब्द मागे घेतले आहेत. भाजपकडून वाढता विरोध, आंदोलनं आणि तीव्र टीका लक्षात घेता सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करताना दिलगिरीही व्यक्त केली आहे.

भाजपचा आक्रमक विरोध, फडणवीसांची माफीची मागणी

सपकाळ यांच्या विधानानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार आक्षेप घेतला. “टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करताना लाज वाटली नाही का?” असा थेट सवाल करत सपकाळ यांनी माफी मागावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. यानंतर राज्यभर भाजप कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या निषेधार्थ आंदोलनं छेडली.

“धमक्या दिल्या, पण घाबरणार नाही”

विधान मागे घेत असतानाच सपकाळ यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला. “भाजपाच्या लोकांनी मला धमक्या दिल्या आहेत. मला घाबरवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. पण मी अशा धमक्यांना भीक घालत नाही.


भाजपविरोधातील भूमिका अधिक तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

फडणवीस प्रशासन अपयशी; आरोपांना उत्तर देणार

फडणवीस यांचं प्रशासन अपयशी ठरलं आहे. त्यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर देतच राहू. ते अंगावर आले तर शिंगावर कसं घ्यायचं हे आम्हाला माहिती आहे. मात्र हिंसा हा आमचा मार्ग नाही,” असे स्पष्ट करत सपकाळ यांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली.

शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी

वादाच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी मवाळ सूरही लावला. “माझ्या विधानामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.” तसेच टिपू सुलतान प्रकरणी केलेले विधान आपण मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नेमकं काय म्हणाले होते सपकाळ?

सपकाळ यांनी यापूर्वी म्हटले होते की, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या स्वराज्याच्या विचारातून प्रेरणा घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात संघर्ष केला. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे योद्धे होते, भारताचे भूमिपुत्र होते आणि त्यांची तुलना शौर्याच्या निकषावर शिवाजी महाराजांशी करता येईल. याच वक्तव्यामुळे मोठा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला.

राजकीय तापमान आणखी वाढणार?

सपकाळ यांनी शब्द मागे घेतले असले, तरी भाजपविरोधातील आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ विधान मागे घेण्यापुरते मर्यादित न राहता, काँग्रेस–भाजप संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.