Koparagoan News | कोपरगावच्या कन्येची यशोगाथा : कष्ट, जिद्द आणि त्यागाचं फळ ‘उषा पवार’!

कोपरगावच्या कन्येची यशोगाथा : कष्ट, जिद्द आणि त्यागाचं फळ ‘उषा पवार’! सफाई कामगार महिलेची मुलगी एसपीएससी पास. उषा पवार हिने अत्यंत गरिबीतून एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन क्लास वन अधिकारी बनत कष्ट आणि जिद्दीचं खरं उदाहरण घालून दिलं आहे.

Nov 1, 2025 - 21:50
Nov 1, 2025 - 21:52
Koparagoan News | कोपरगावच्या कन्येची यशोगाथा : कष्ट, जिद्द आणि त्यागाचं फळ ‘उषा पवार’!
Koparagoan News Usha Pawar MPSC Successfully Girl

कोपरगाव: कष्ट आणि जिद्द या दोन शब्दांचा खरा अर्थ काय असतो, हे कोपरगावच्या एका कन्येने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या उषा गंगाधर पवार या तरुणीने एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण ( MPSC Exam Results Paas) होऊन क्लास वन अधिकारी होण्याचं स्वप्न साकार केलं आहे. तिच्या या यशानं केवळ तिचं कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण कोपरगाव शहर गहिवरून गेलं आहे.

(usha-pawar-mpsc-success-story-from-kopargaon)

कोपरगाव शहरातील ( Kopargaon News) सुभाषनगर भागात राहणाऱ्या उषाच्या आयुष्यात लहानपणीच नियतीने मोठा आघात केला आणि वडिलांचं छत्र हरपलं. त्यानंतर तिची आई अहिल्याबाई पवार यांनी कुटुंबाचा आधारस्तंभ होण्याची जबाबदारी स्वीकारली. मिळेल ते सफाईचं काम करून त्यांनी घर चालवलं, तर भाऊ ज्ञानेश्वर पवार याने शहरातील रस्त्यांवर बूट पॉलिश करून बहिणीच्या शिक्षणासाठी हातभार लावला.

आई आणि भावाच्या अफाट त्यागाला उषाने कधीच वाया जाऊ दिलं नाही. तिच्या प्रत्येक पुस्तकात, प्रत्येक अभ्यासाच्या तासात आईच्या घामाचा आणि भावाच्या कष्टाचा कसं पणाला लागला होता.

गुरुवारी सायंकाळी एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि उषा उत्तीर्ण झाल्याचं कळताच तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले. हे अश्रू केवळ यशाचे नव्हते, तर आई आणि भावाच्या अथक परिश्रमांचं सोनं झाल्याचं समाधान त्यात दडलं होतं.

ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण कोपरगावभर पसरली. सुभाषनगरसह शहरातील नागरिकांनी उषाच्या घरी जाऊन तिचं अभिनंदन केलं. कोपरगावाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे ( BJP Snehlata Kolhe Kopargaon ) तसेच शहर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने यांनीही तिचा विशेष सत्कार केला.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून यशाचं शिखर गाठणाऱ्या उषाने आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय तिच्या कर्तव्यनिष्ठ आईला आणि त्यागी भावाला दिलं आहे.

“माझं हे यश फक्त माझं नाही. हे माझ्या आईच्या घामाचं आणि भावाच्या कष्टाचं फळ आहे. त्यांनी माझ्यासाठी जे काही केलं, त्याची परतफेड मी सेवेतून करू शकेन, हीच माझ्यासाठी खरी अभिमानाची गोष्ट आहे,” असं उषा भावनिकपणे म्हणाली.

उषा पवार यांनी केवळ अधिकारी पद मिळवलं नाही, तर हजारो गरिबीत वाढणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.
त्यांचा प्रवास सांगतो जर मनात जिद्द असेल, तर कोणतीही आर्थिक अडचण यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही.

Manish Manish Dawange is a passionate journalist dedicated to truthful, people-centric reporting. He focuses on ground realities, social issues, and impactful stories that give voice to the unheard.