पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे जुन्ह्याच मार्गानेच राबवा – ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प 2019 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या जुन्ह्या मार्गानेच राबवावा, अशी मागणी जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. अकोले तालुका वगळून मार्ग बदलण्याच्या प्रस्तावामुळे लोकप्रतिनिधी व जनतेमध्ये नाराजी व संभ्रम निर्माण झाला असून, ही भावना राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचवावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

Dec 23, 2025 - 19:57
Dec 23, 2025 - 20:07
पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे जुन्ह्याच मार्गानेच राबवा – ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
radhakrishna vikhe patil demand pune nashik high speed railway old route

राहाता । पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प 2019 (Pune Nashik Railway Project) मध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या जुन्ह्या मार्गानेच कार्यान्वित करण्यात यावा, अशी ठाम मागणी जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्याकडे केली आहे. लोकप्रतिनिधी आणि जनतेची भावना राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचवावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

पालकमंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुणे–नाशिक हायस्पीड (Sangamner Akole Railway Route) रेल्वे मार्गाबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. या संदर्भातील वस्तुस्थिती त्यांनी लेखी स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

केंद्रीय रेल्वे विभागाने २०१९ साली पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा नारायणगाव–संगमनेर–अकोले–सिन्नर (Akole Taluka News) असा मार्ग प्रस्तावित केला होता. या मार्गावर काही ठिकाणी जमिनींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे. मात्र आता या प्रस्तावात बदल करून अकोले तालुका वगळून नारायणगाव–संगमनेर–नाशिक असा नवीन मार्ग प्रस्तावित केल्याची बाब समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

प्रकल्पाच्या मार्गात बदल करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेण्यात आल्याकडे लक्ष वेधत, यामुळे लोकप्रतिनिधी व जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे ना. विखे पाटील यांनी नमूद केले. सध्या प्रशासकीय पातळीवर प्रकल्पाबाबत नेमकी कोणती कार्यवाही सुरू आहे, याबाबतही स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या रेल्वे मार्गात नारायणगाव येथील जेएमआरटी रेडिओ टेलिस्कोप सेंटरची अडचण असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. ही संपूर्ण वस्तुस्थिती लक्षात घेता, सर्व लोकप्रतिनिधींची बैठक (Pune Nashik Rail Corridor) बोलावून प्रकल्पाच्या मार्गाबाबत असलेल्या भावना समजून घ्याव्यात, अशी मागणीही ना. विखे पाटील यांनी केली आहे.

२०१९ मध्ये तयार करण्यात आलेल्या प्रकल्प अहवालानुसारच पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि जनतेची भावना केंद्रीय रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचवावी, अशी ठाम भूमिका पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चेदरम्यान मांडली आहे.