महानगरपालिका निवडणूक अपडेट |भाजप शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत

राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 15 जानेवारी 2025 रोजी मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जागावाटपावरून तणाव निर्माण झाला आहे. दादर येथील वसंत स्मृती भवनात पार पडलेल्या बैठकीत शिंदे गटाने 227 पैकी निम्म्या जागांवर दावा केला, तर भाजपने 2017 मध्ये जिंकलेल्या आणि काही वादग्रस्त जागांवर आपला हक्क सांगितला आहे. मुंबईत युती कायम राहणार असली तरी पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत.

Dec 18, 2025 - 17:14
महानगरपालिका निवडणूक अपडेट |भाजप शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत

Election : राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, येत्या 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 15 जानेवारी 2025 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2025 रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्ष अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असल्याचं चित्र आहे. राज्यातील काही महत्त्वाच्या महापालिका निवडणुका भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीतून लढवल्या जाणार आहेत. अशातच मुंबई महापालिका निवडणुकीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादर येथील वसंत स्मृती भवनात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं चित्र आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 227 जागांपैकी निम्म्या जागांवर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे.

मात्र दुसरीकडे, भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली असून 2017 मध्ये शिवसेनेने जिंकलेल्या काही जागांवरही भाजपने दावा केला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजपने 2017 साली जिंकलेल्या 82 प्रभागांवरील आपला दावा कायम ठेवला आहे.

याशिवाय, 2017 साली बंडखोरीमुळे पराभूत झालेल्या भाजप उमेदवारांना मिळालेली मते आणि बंडखोर उमेदवारांना मिळालेली मते एकत्र केल्यास ती शिवसेनेच्या विजयी उमेदवारांपेक्षा जास्त असतील, अशा जागांवरही भाजपने दावा केला आहे, अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान, 2017 मध्ये मुंबई महापालिकेच्या प्रभागांची पुनर्रचना झाल्याने शिवसेना शिंदे गटाने भाजपचा हा दावा फेटाळून लावला आहे. 2014 किंवा जुन्या आकडेवारीच्या आधारे जागावाटप करणे योग्य ठरणार नाही. सध्याच्या परिस्थितीत ती आकडेवारी लागू होत नाही, अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाने बैठकीत मांडल्याची माहिती आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीतून निवडणूक लढवणार आहेत, मात्र पुणे महापालिकेत भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. पुण्यात महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.