Ahilyanagar Cloudburst | पावसाचा हाहाकार ! अहिल्यानगर जिल्ह्यातील काही शाळांना दोन दिवस सुट्टी..
राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर जिल्ह्याच्या घाटमाथ्यालाही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशातच सुरक्षिततेच्या कारणास्तव अहिल्यानगरमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Ahilyanagar Cloudburst | अहील्यानगर जिल्ह्यातील काही भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची तातडीची बैठकी पार पडली आहे. या महत्वपुर्ण बैठकीत जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन, शाळांना सुट्टी देण्याता अधीकार ग्रामस्तरावर देण्याच आदेश पारीत करण्यात आला आहे.
(due-to-heavy-rain-flood-ahilyangar-declares-schools-close-for-next-two-days-orange-and-yellow-alerts-for-ahilyanagar)
15 आणि 16 सप्टेंबर 2025 या दोन दिवसांत, परिस्थिती गंभीर असल्यास शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शालेय व्यवस्थापन समिती घेऊ शकेल. हा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत तर पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पुर परिस्थिती निर्माण झाल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार, जिल्हाधिकारी हे प्राधिकरणाचे अध्यक्ष असल्यानं शासनाच्या परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहिर करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. मात्र, आता स्थानिक पातळीवर शालेय व्यवस्थापन समितीला हा अधिकार देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील 19 महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय, हवामान खात्याने जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिलेला असल्यानं हा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात परतीच्या पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि पावसाळी नाल्याजवळ, पूलांवरून किंवा पाण्याने भरलेल्या रस्त्यांवरून जाण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, हवामानातील बदल आणि समुद्रातील तापमानवाढ यामुळे राज्यातील परतीचा पाऊस तीव्र झाला आहे. अशा परिस्थितीत प्रशासन, पोलीस विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहेत. नागरिकांना सतत हवामान विभागाचे अलर्ट लक्षात घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय गरज असल्यास बाहेर पडा असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.