कोपरगाव | गॅस नळीचा स्फोट; हलवाई वडा सेंटरला आग, एक तरुण भाजून जखमी

Kopargaon city मधील Mahatma Gandhi Chowk येथील प्रसिद्ध Halwai Wada Center येथे gas cylinder hose blast झाल्याने अचानक fire लागल्याची घटना दुपारी सुमारे 2 PM च्या सुमारास घडली. एक तरुण burn injured झाला असून, fortunately कोणतीही loss of life झालेली नाही. Wada बनवत असताना gas stove ला जोडलेली hose overheat होऊन leak झाली आणि gas ने पेट घेत मोठा blast झाला. विशेष म्हणजे, गंभीर जखमी अवस्थेत असतानाही Nitin ने presence of mind दाखवत तात्काळ gas cylinder cock बंद केला, त्यामुळे major disaster टळला. Blast नंतर shop मध्ये fire पसरली होती. Incident चा आवाज होताच local citizens घटनास्थळी धावले. यावेळी Mukund Jadhav यांनी burning cloth बाहेर काढत धाडस दाखवले. नागरिकांनी gas cylinders बाहेर काढून आग आटोक्यात आणली. Kopargaon Municipal Fire Brigade आणि Police Administration तातडीने घटनास्थळी दाखल झाले. Fire brigade येईपर्यंत आग नियंत्रणात आली होतया घटनेमुळे परिसरात काही काळ panic situation निर्माण झाली होती. सध्या प्रशासनाकडून further investigation सुरू आहे.

Feb 14, 2026 - 18:35
कोपरगाव | गॅस नळीचा स्फोट; हलवाई वडा सेंटरला आग, एक तरुण भाजून जखमी
kopargaon gas cylinder hose blast

कोपरगाव : शहरातील महात्मा गांधी चौक येथील प्रसिद्ध (Kopargaon News) हलवाई वडा सेंटर येथे गॅस टाकीच्या नळीचा अचानक स्फोट (gas cylinder hose blast) होऊन आग लागल्याची घटना आज शनिवार दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत नितीन हलवाई हा तरुण भाजून जखमी झाला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, वडे बनवित असताना शेगडीला जोडलेल्या गॅस टाकीची नळी गरम होऊन लीक झाली. गॅसने पेट (gas stove) घेतल्याने मोठ्या आवाजात स्फोट झाला आणि क्षणार्धात आग भडकली.

प्रसंगावधानाने टळला मोठा अनर्थ

आगीत भाजून जखमी असूनही नितीन हलवाई यांनी धैर्य दाखवत गॅस टाकीखालचा कॉक तात्काळ बंद केला. त्यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली.

नागरिकांचे धाडस

स्फोटाचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुकानातील पेटलेले फडके मुकुंद जाधव यांनी धाडसाने बाहेर काढले. नागरिकांनी गॅस टाक्या बाहेर काढून आग विझवली.

अग्निशमन दल दाखल

कोपरगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. मात्र तोपर्यंत आग आटोक्यात आली होती.

भीतीचे वातावरण; तपास सुरू

या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मोठी गर्दी जमली होती. पोलीस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी हजर होत परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.